Porvorim Crime News: फोंड्यातील तरुणीने पोलिसांनाच केली मारहाण! मोबाईलही तोडला; पर्वरी पोलिसात गुन्हा दाखल

संशयित मेहबूब शेख हिला उद्यापर्यंत (23 जानेवारी) न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Porvorim Crime News
Porvorim Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

शनिवारी (20 जानेवारी) पर्वरी येथे एका तरुणीने चक्क पोलिसांनाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मेहबूब शेख (25. भोमा) या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Porvorim Crime News
Goa Daily News Wrap: प्राण प्रतिष्ठा सोहळा, गुन्हे, राजकारण; दिवसभरात गोव्यात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

कॉन्स्टेबल अक्षय पारसेकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. माहितीनुसार, अक्षय पारसेकर आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी प्रसाद सावंत पर्वरीमध्ये कार्यरत असताना तरुणीने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने त्यांच्या मोबाईल फोनचेही नुकसान केले. तसेच त्यांच्या वाहनावर दगडफेक करून नुकसान केले.

संबंधित प्रकार घडल्यानंतर तरुणीवर तक्रार दाखल करत भादंसंनुसार 353, 504, 186, 427 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान संशयित मेहबूब शेख हिला उद्यापर्यंत (23 जानेवारी) न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. पर्वरी पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल मदन तारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com