ओडिशा एफसीने सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात एफसी गोवा संघावर 3-2 फरकाने विजय नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भुवनेश्वर येथे सामना झाला. या निकालासह एफसी गोवाची मोसमातील अपराजित मालिकाही खंडित झाली.
वागातोर येथील एका क्लबमध्ये विदेशी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमली पदार्थाचा ओव्हरडोस झाल्याने पर्यटकाटा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी बाबरी मशिदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने म्हपशात तणाव. चौकशीसाठी तीन तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात. अधिक तपास सुरु.
'येत्या तीन वर्षात सत्तरी-ऊसगाव मधील 15 हजार नागरिकांनी अयोध्येतील राम मंदिर दर्शन घडवले जाणार आहे. फेब्रुवारीपासून प्रत्येक आठवड्यात एक फेरी अयोध्येला रवाना होईल,' अशी माहिती राणे यांनी दिली आहे.
'हा क्षण म्हणजे मंदिर वहीं बनाएंगे वचनपूर्तीचा, भारतीय सभ्यतेच्या पुनरुत्थानाचा आहे,' अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
म्हापसा येथील हॉटेल बलभीमला आग. स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरने अचानक घेतला पेट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आधी हॉटेल मालकाने अग्नीरोधकच्या सहाय्याने आग विझवण्याचा केला प्रयत्न; मात्र आग भडकल्याने अग्निशमन दलास पाचारण.
राज्यात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे कॉंग्रेस नेते प्रतापसिंह राणेंचाही जय श्रीरामचा नारा. घराबाहेर सपत्नीक उभारला भगवा ध्वज.
पणजीतील कॅसिनोमधून एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. कॅसिनोमधील कर्मचाऱ्याने खोटा गेम रिपोर्ट सादर करुन गेस्टला 1.70 लाखांचा बोनस मिळवून दिला. सोमवारी (दि.22) हा प्रकार उघडकीस आला.
पणजी पोलिसांनी याप्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भाजप सरकारने 6 ऑगस्ट 2019 रोजी हटवले. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरला राज्य तर लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक महत्व असलेल्या या निर्णय व एकंदर घडामोडीचा प्रवास सिनेमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शन गोव्याचे आदित्य जांभळे यांनी केले आहे.
राममंदिराच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी फुलांचा वापर करून सुंदर श्रीराम प्रतिकृती तयार केली.
कारसेवक पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांचा पणजी महालक्ष्मी मंदीर व्यवस्थापनाकडून सत्कार. कॉलेजच्या प्रथम वर्षात असताना कारसेवा सावंतांनी कारसेवा केली होती.
डिचोली पोलिसांनी महाराष्ट्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक पकडले. डिचोली शहरातील वाल्शी परिसरात ही कारवाई करण्यात आली. ट्रक जप्त केल्यानंतर सहा चालकांना अटक करण्यात आली आहे.
बाबूश यांना रविवारी रात्री घरी असताना हलका हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तत्काळ गोमेकॉत हलविण्यात आले असून, तेथून त्यांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. बाबूश यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी ' गोमन्तक टीव्हीला' ला दिली माहिती.
पणजीचे आमदार आणि मंत्री बाबुश मोन्सेरात यांना ह्रदय विकाराचा झटका. जीएमसीत झाली एनजिओप्लास्टी. पुढील उपचारांसाठी मुंबईत जाणार असल्याची माहिती.
साखळीत राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्री राम रथाची पूजा करून विजयोत्सवाला प्रारंभ. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक राम रथाची पूजा केली. असंख्य रामभक्तांची उपस्थिती असून उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त साखळी मतदारसंघात विजयोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. हरवळे येथे श्री रूद्रेश्वर मंदिराकडून श्री रामाच्या रथाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधीवत पूजा करून रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी मोठ्या संख्येने रामभक्तांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब कोठंबीच्या चंद्रेश्वर मंदिरात दर्शन घेतले.
प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राज्यभर उत्सवाचे वातावरण आहे. यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहकुटुंब हरवळेच्या रुद्रेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी ते भक्तांसोबत रामनामात तल्लीन झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गोव्यातही या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र साफसफाई, सजावट, सुशोभीकरण सुरु असून राजधानी पणजीत सर्वत्र भगवे ध्वज तसेच श्रीरामाच्या प्रतिकृती, मंदिरांचे कटआऊट उभारलेले दिसत आहेत.
भाजपच्या वतीने मागील काही दिवस राज्यात साफसफाई, सजावटीचे कार्यक्रम सुरु असून भाजपच्यावतीने देशभरात मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले गेले होते.
अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी म्हणजेच सोमवारी (ता. २२) राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर श्री राम पूजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. यादिवशी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात मद्य, तसेच मांसाहारी पदार्थ विक्रीवर बंदी घातली आहे.
गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 97.41
Panjim ₹ 97.41
South Goa ₹ 97.75
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 89.97
Panjim ₹ 89.97
South Goa ₹ 90.29
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.