Porvorim: प्रशासन गंभीर आहे का? पर्वरीतील दुर्घटनेवरून स्थानिक संतप्त; फलक, खड्डे, वाहतूक जाम प्रश्नाचे भिजत घोंगडे

Porvorim Flyover: पर्वरीतील गिरी ते सांगोल्डा मार्गावर उड्डाणपुलाचे सेगमेंटचे काम सुरू असताना प्रशासनाने पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
Porvorim Flyover News
Porvorim FlyoverX
Published on
Updated on

पणजी: पर्वरीतील गिरी ते सांगोल्डा मार्गावर उड्डाणपुलाचे सेगमेंटचे काम सुरू असताना प्रशासनाने पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी सेगमेंट कोसळल्याची दुर्घटना घडली असून, या घटनेमुळे काहीजण जखमी झाले, त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर लोकांत तीव्र संताप पसरला असून, सेगमेंटचे काम सुरू असलेल्या मार्गावर वाहतूक त्वरित वळवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रस्त्यालगत असलेले खड्डे, सेगमेंटच्या बाजूने सुरू असलेले बांधकाम, अर्धवट उघडे खांब, आणि अवजड यंत्रसामग्रीमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गिरी येथे रस्त्यावर एक खोल खड्डा आहे. एखाद्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला, तर जबाबदारी कोण घेणार, असा सवाल चालक करत आहेत.

पाण्यामुळे खड्डेही कळत नाहीत !

ज्या मुख्य मार्गावरून गिरी ते कोकेरोपर्यंत वाहक वाहन चालवतात त्यांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचे चित्र रस्त्याची दुर्दशा पाहिल्यावर डोळ्यांपुढे आल्यावाचून राहत नाही. दुचाकी या खड्ड्यांमध्ये पडली तर दुखापत तर नक्कीच! दरम्यान, पावसाचे पाणी आल्याने खड्डेही कुठे आहेत हे कळत नाही. त्यामुळे प्रशासन नेमके काय करते? असा प्रश्‍न उद्‍भवणे साहजिकच आहे.

प्रशासन गंभीर आहे का?

रविवारी गिरी परिसरात उड्डाणपुलाच्या खांबांवर सेगमेंट बसवले जात असताना अचानक एक सेगमेंट कोसळला. या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली, तरी काही नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्या आणि त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, अशा गंभीर घटनेनंतरही संबंधित विभागांनी कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.

समन्वयाचा अभाव

सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना कोणत्या वेळी वाहतूक वळवावी, कोणते मार्ग बंद करावेत, फलक लावावेत, यावर एकसंध निर्णय होत नाही. परिणामी, कामाच्या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावत आहे.

पर्यायी मार्गांचा अभाव

सध्या गिरी सिग्नल ते सांगोल्डा जंक्शनपर्यंत सेगमेंटचे काम सुरू होणार आहे. येथील वाहतूक वळविण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाने सांगोल्डा जंक्शनपर्यंत काम झाल्यानंतरच मुख्य मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. दरम्यान या मार्गावर सेगमेंटचे काम सुरू असताना वाहतूक चालू ठेवणे धोक्याचे आहे.

फलक नसल्‍याने कोंडी कायम

गिरी परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न आता गिरी येथे सेगमेंटचे काम सुरू असल्याने दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या मार्गावर पर्यायी मार्गांचे योग्य फलक लावलेले नाहीत अशी तक्रार वाहनचालक करतात. काही ठिकाणी फलक असले, तरी ते झाडांआड झाकलेत. चालकांना पर्यायी मार्ग माहीतच होत नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते.

सरकारने या पर्वरी उड्डाणपूल कामाच्या गंभीर स्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर भविष्यात अधिक मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

१ गिरी सिग्नल ते सांगोल्डा जंक्शन दरम्यानचा मार्ग सेगमेंट काम सुरू असताना तात्काळ वाहतुकीस बंद करावा.

२ पर्यायी मार्गांवरही स्पष्ट आणि मोठे दिशादर्शक फलक लावावेत.

३खड्डे, उघडी कामे, अवजड यंत्रसामग्री यांची बॅरिकेडस्द्वारे सुरक्षितता सुनिश्चित करावी.

४सार्वजनिक बांधकाम खाते आणि वाहतूक विभाग यांच्यात नियमित समन्वय बैठका घेऊन निर्णय प्रक्रिया गतिमान करावी.

Porvorim Flyover Construction Update
Porvorim Flyover Construction Dainik Gomatnak

सेगमेंटचा मलबा हटविण्‍यास प्रारंभ

पर्वरी-गिरी येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान काल रविवारी दुपारी एक सेगमेंट अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चौघांना किरकोळ जखमा झाल्या. कोसळलेला सेगमेंट तसाच न ठेवता त्याचा मलबा करून तो हटवण्‍याचे काम सुरू करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून या मलब्याचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आता हा मलबा नियोजित जागी हलविण्याचे काम वेगाने सुरू आहे. वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. संबंधित यंत्रणांनी नियोजन करून वाहतूक सुरळीत सुरू ठेवली आहे.

Porvorim Flyover News
Porvorim Flyover: आधी कला अकादमी, मग लईराई जत्रा, आता.. पर्वरी दुर्घटना! जीवितहानी नाही म्हणजे सगळे आलबेल आहे असे नाही

सांगोल्डा बायपासचा अपुरा वापर

१. गिरी सिग्नलहून डावीकडे वळल्यास सुकूरमार्गे डिफेन्स कॉलनीकडे पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. तसेच गिरी खुरसापासून सांगोल्डा जंक्शनमार्गे कोकेरोपर्यंत जाणारा बायपास मार्ग देखील आहे. या मार्गांचा वापर करून सेगमेंटच्या कामासाठी आवश्यक असलेला मुख्य मार्ग टाळता येतो.

२. मात्र, या मार्गांवर पुरेसे दिशादर्शक फलक नसल्याने चालकांना हे पर्याय माहिती होत नाहीत. यामुळे वाहने मुख्य मार्गावरून जातात आणि धोका वाढतो.

Porvorim Flyover News
Porvorim Accident: ..सर्वांवर फौजदारी कारवाई करा! पर्वरी पूल दुर्घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; सुरक्षेबाबत प्रश्न केले उपस्थित

वाहतूक गिरी खुरसाकडून वळवता येईल का?

गिरी येथील खुरसाकडून गिरी येथे सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी वाहतूक वळविता आली असती पण ते प्रशासनाने केले नाही. इथून वाहतूक वळविली असती तर सांगोल्डा मार्गाने कोकेरो मार्गावर वाहन पोहोचले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com