Porvorim: पर्वरीवासियांसाठी गुड न्यूज! उड्डाणपुलाचे सर्व 88 खांब उभे; पावसातही काम युद्धपातळीवर

Porvorim Flyover: पर्वरी परिसरातील सततच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून हाती घेण्यात आलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे.
Porvorim flyover work progress
Porvorim Flyover NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्वरी परिसरातील सततच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून हाती घेण्यात आलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेली खांब उभारणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. उड्डाणपुलाचे सर्व ८८ खांब उभे राहिले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या संरचनेचा मुख्य पाया आता पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.

सदर उड्डाणपुलाच्या कामाचे आता पुढील टप्पे म्हणजे ड्रेनेज सिस्टीम, सेगमेंट कास्टिंग आणि लॉन्चिंग यावर भर दिला जात आहे. सेगमेंट कास्टिंग म्हणजे पुलाचे वेगवेगळे भाग जागेवरच तयार करून नंतर त्यांना विशिष्ट यंत्रणेद्वारे उभारणे, ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रक्रिया आहे. हे काम प्रगत साधनांच्या साहाय्याने पार पाडले जात आहे. अनुभवी अभियंते आणि कुशल मनुष्यबळ यांच्यामार्फत कामे यशस्वीपणे तडीस लावली जात आहेत.

पर्वरी परिसर हा राजधानी पणजीकडे येणाऱ्या आणि म्हापसा, पर्वरी या भागांकडून येणाऱ्या वाहतुकीसाठी एक मुख्य जंक्शन आहे. यामुळे येथे दररोज सकाळ-संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. हा उड्डाणपूल पूर्णत्वास गेल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांना याचा थेट फायदा होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी सदर प्रकल्पाच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. नियमित पाहण्या आणि कामाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र पथके कार्यरत करण्‍यात आलेली आहेत. विभागाने स्पष्ट केले आहे की, कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून अनावश्यक विलंब टाळण्यावर भर दिला जात आहे.

Porvorim flyover work progress
Porvorim Fire News: पर्वरीत ऑफिसच्या गोदामाला भीषण आग! 2.5 कोटींची हानी; OFC केबलसह दोन मालवाहू गाड्या जळाल्या, Video

सकाळ-संध्‍याकाळ वाहतुकीची कोंडी

सकाळ आणि संध्‍याकाळी पर्वरीत प्रचंड वाहतूक कोंडी होते. पर्वरी उड्डाणपुलाचे काम हे भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असले तरी काम सुरू असताना नागरिकांना सुसज्ज पर्यायी रस्ते देणे ही सरकारची तेवढीच मोठी जबाबदारी आहे. पण येथे नेमके उलटे दिसून येत आहे, अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहते. अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही तात्पुरती देखील डागडुजी होत नाही. पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

Porvorim flyover work progress
Porvorim: गिरी, सांगोल्डा, पर्वरी रस्ता 70% खड्ड्यांत! महामार्गाची दयनीय अवस्था, अपघातांना देतेय आमंत्रण

खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

पर्वरी उड्डाणपुलाचे काम सध्या वेगाने सुरू असताना या परिसरातील वाहतूक व्यवस्थेची मात्र दयनीय अवस्था झाली आहे. गिरी ते पर्वरी कोकेरोपर्यंतच्‍या रस्‍त्‍याची अक्षरश: चाळण झाली आहे. विशेषतः क्रोमा शोरूमजवळचा परिसर खड्ड्यांनी भरलेला झाला आहे. या भागातून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. रस्त्यांवरील खड्डे इतके खोल आहेत की पावसाच्या पाण्याने ते भरलेले असतात. त्‍यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांत घसरून पडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com