Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबारामागे 'सूरज'चा हात? कॅसिनो व्यवसायाशी संबंधित कारणाचा पोलिसांना संशय; तपास निर्णायक टप्प्यात

Porvorim Firing Case Latest Update: पर्वरी येथील कॅसिनो व्यावसायिक श्रीनिवास नायक यांच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.
Porvorim Firing Case Latest Update
Srinivas Naik Firing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: पर्वरी येथील कॅसिनो व्यावसायिक श्रीनिवास नायक यांच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. कॅसिनो व्यवसायाशी संबंधित कारणातूनच हा गोळीबार झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणामागे सूरज नाईक नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय असून, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, संशयित शूटर अर्पुथराज याने केलेल्या गंभीर आरोपांचा समावेश असलेला व्हिडिओ यापूर्वी प्रसारित करणाऱ्या अधिवक्ता अनिता यांनी आपले आधीचे कथन मागे घेतले आहे. त्यामुळे गोळीबारामागील कथित कट, सुपारीची रक्कम आणि नेमका हेतू याबाबतच्या चर्चेला आता वेगळे वळण मिळाले आहे.

Porvorim Firing Case Latest Update
Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

यापूर्वी प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अर्पुथराज याने श्रीनिवास नायक यांच्या सांगण्यावरून गोळीबाराचा बनाव करण्यात आल्याचा दावा केला होता. या कामासाठी एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन मिळाले होते, त्यापैकी पाच लाख रुपये आगाऊ मिळाल्याचे त्याने म्हटले होते. गोळीबार नियोजित आणि नियंत्रित स्वरूपाचा असावा, तसेच कोणालाही गंभीर दुखापत होऊ नये, अशा स्वरूपाचे नियोजन असल्याचा दावाही त्याने केला होता.

मात्र, अर्पुथराज ताब्यात घेतल्यानंतर त्याने तपास यंत्रणेला वेगळी माहिती दिल्याचे अधिवक्ता अनिता यांनी आता म्हटले आहे. नायक यांनी गोळीबार घडवून आणण्याचे कोणतेही निर्देश दिले नसल्याचे अर्पुथराजने नंतर सांगितल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, या कामासाठी ‘सुरज’ नावाच्या व्यक्तीमार्फत संपर्क झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आधीच्या व्हिडिओबद्दल माफी

यापूर्वी अर्पुथराजच्या आरोपांचा व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल अधिवक्ता अनिता यांनी नायक यांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमुळे नायक यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचे त्यांनी मान्य केले आहे. आरोपीने सुरुवातीला केलेल्या दाव्याला अंतिम सत्य मानू नये, असे आवाहनही त्यांनी माध्यमांना केले आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे पर्वरी गोळीबार प्रकरणातील तपासासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. गोळीबारामागील नेमका हेतू, कथित सुपारीची रक्कम, कटात सहभागी व्यक्ती आणि अर्पुथराजने तपास यंत्रणेला दिलेली माहिती याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे. सध्या या प्रकरणातील विविध दावे संबंधित व्यक्तींनी केलेले असून, त्यांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.

Porvorim Firing Case Latest Update
Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

दाव्यांची दोन रूपे

पहिला दावा : नायक यांच्या सांगण्यावरून गोळीबाराचा बनाव केल्याचे अर्पुथराजचे कथित म्हणणे.

कथित रक्कम : एक कोटी रुपयांचे आश्वासन आणि पाच लाख रुपये आगाऊ मिळाल्याचा दावा.

नंतरचे कथन : नायक यांनी गोळीबाराचे निर्देश दिले नसल्याचे अर्पुथराजने सांगितल्याचा अधिवक्ता अनिता यांचा दावा.

नवा आरोप : ‘सुरज’मार्फत काम देण्यात आल्याचा दावा.

अन्य पथकाबाबत दावा : ७५ लाख रुपये आगाऊ आणि कामानंतर १० कोटी रुपयांबाबत कथित बोलणी.

महत्त्वाचे : या सर्व दाव्यांची अधिकृत तपासातून स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.

‘हिट लिस्ट’वर असल्याचा दावा

श्रीनिवास नायक यांचे नाव जवळपास वर्षभरापासून ‘हिट लिस्ट’वर असल्याचा दावाही अधिवक्ता अनिता यांनी केला आहे. याशिवाय, यापूर्वी अन्य एका पथकाला ७५ लाख रुपये आगाऊ देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती.

काम पूर्ण झाल्यानंतर आणखी १० कोटी रुपये देण्याबाबत कथित बोलणी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या दाव्यांमुळे प्रकरणातील कथित सुपारी, हल्ल्याचे नियोजन आणि त्यामागील व्यक्तींबाबत तपासाची व्याप्ती वाढली आहे. मात्र, या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Firing Case Latest Update
Goa Casino Director Shooting Case
Srinivas Naik Shooting Case Goa
Srinivas Naik Firing Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com