पर्वरीतील 'त्या' बनावट कॉल सेंटरचा सूत्रधार अमेरिकेत...

पर्वरी येथे पर्दाफाश केलेल्या बनावट कॉल सेंटरचा सूत्रधार अमेरिकेत बसून भारतातील व्यवहाराची सूत्रे हाताळत होता.
Fraud of foreign nationals, fake call center exposed by Porvorim police
Fraud of foreign nationals, fake call center exposed by Porvorim policeDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Fake Call Center: पर्वरी येथे पर्दाफाश केलेल्या बनावट कॉल सेंटरचा सूत्रधार अमेरिकेत बसून भारतातील व्यवहाराची सूत्रे हाताळत होता. अमेरिकन नागरिकांची कर्जापोटी रक्कम स्वीकारून फसवणूक केलेली रक्कम अमेरिकेतील सूत्रधार सागर मेहतानी याच्या खात्यामध्ये भारतातून हवालाद्वारे जमा होत होती.

Fraud of foreign nationals, fake call center exposed by Porvorim police
Pernem Police News: मोरजीतील पोस्ट ऑफिसची 8 लाखांची फसवणूक; सावंतवाडीतील एकास अटक

या बनावट कॉल सेंटरच्या व्यवहारातील मुख्य सूत्रधार सागर मेहतानी व त्याची पत्नी बन्सारी तनवानी हे आहेत. ज्या बंगल्यामध्ये हे बनावट कॉल सेंटर सुरू होते, तो भाडेपट्टीवर घेण्यात आला आहे.

या प्रकरणी बंगल्याच्या मालकाला यासंदर्भात माहिती होते की नाही याच्या चौकशीसाठी समन्स पाठवण्यात येणार आहे. लोन कंपनी किंवा मर्चंट ॲडव्हान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत होते व त्यांना कर्ज मिळवण्यासाठी मदत केली जाईल असे आश्‍वासन देत होते.

Fraud of foreign nationals, fake call center exposed by Porvorim police
Panjim Municipality: माहिती देण्यास जाणीवपूर्वक विलंब करणे भोवले; पणजी महापालिकेच्या माहिती अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

त्यांनी कर्जासाठी केलेले अर्ज मंजूर करण्यासाठी कर्जाच्या 10 टक्के रक्कम ही सुरक्षा ठेव, प्रोसेसिंग शुल्क म्हणून गुगल प्ले गिफ्ट कार्ड किंवा ॲपल पे गिफ्ट कार्ड किंवा वालमार्ट गिफ्ट कार्ड किंवा टार्गेट गिफ्ट कार्ड या अकाऊंटवर जमा करण्यास सांगत होते. ही जमा करण्यात आलेली रक्कम अमेरिकन एजंटकडे सुपूर्द केली जात होता.

साहित्याचा तपशील

पोलिस निरीक्षक विकास देयकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी या घातलेल्या छापावेळी 13 लॅपटॉप, 13 मोबाईल फोन्स, 4 मोडेम्स, 4 राऊटर्स मिळून सुमारे 15 लाखांचे साहित्य जप्त केले आहे. संशयिताविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 सी व 66 डी खाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक नारायण चिमुलकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com