Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्ग खुला; स्वातंत्र्यसैनिक दाद देसाई भारावले, दिगंबर कामतांसोबत केली पहिली सवारी

Porvorim Elevated Road Opens: पर्वरी येथील उन्नत मार्गावरून देसाई यांची कार आज पहिल्यांदा गेली.
Porvorim Elevated Road Opens
Porvorim Elevated RoadDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा मुक्त झाला तेव्हा राज्याचा एवढा विकास होईल असे वाटले नव्हते. आजचा गोव्याचा विकास हा कल्पनातीत आहे, असे उद्‍गार स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास ऊर्फ दाद देसाई यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना काढले.

पर्वरी येथील उन्नत मार्गावरून देसाई यांची कार आज पहिल्यांदा गेली. त्यावेळी देसाई यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर होते. देसाई यांनी सांगितले, की पर्वरीची वाहतूक कोंडी दूर करणाऱ्या उन्नत मार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. गेले तीन दिवस कामत मला यासाठी यावे, असे म्हणत होते. त्यानुसार मी तेथे गेलो आणि प्रगतीचे आणखी एक पाऊल अनुभवले.

Porvorim Elevated Road Opens
Goa Police Vacancies: गोवा पोलिसात 'DSP'ची तब्बल 58 पदे रिक्त! 'खाकी'वर वाढला कामाचा ताण; सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

प्रगती व्हावी पण त्याचा उपद्रव इतरांना होता कामा नये असे सांगून ते म्हणाले, की गोव्याने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. विशेषतः उन्नत मार्गासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कामत यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. दरम्यान, गिरीच्या बाजूने डॉ. सिडनी पिंटो रुझारियो यांनी झेंडा दाखविल्यानंतर गणेशमूर्ती असलेले वाहन उन्नत मार्गावरून रवाना करण्यात आले. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com