Porvorim: ...म्हणून यंदा पर्वरीत कार्निव्हल अन् शिगमोत्सव होणार नाही!

Porvorim Carnival & Shigmo Festival 2025 Canceled: पर्वरी येथे यंदा कार्निव्हल (28 फेब्रुवारी) आणि शिगमो (29 मार्च) हे दोन महत्त्वाचे उत्सव रद्द करण्याचा निर्णय पर्वरी शिगमोत्सव आणि कार्निवल समितीने घेतला आहे.
Porvorim Carnival & Shigmo Festival 2025 Canceled
Porvorim Carnival & Shigmo Festival 2025 CanceledDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Carnival & Shigmo Festival 2025 Canceled Due To Traffic Issues

पणजी: पर्वरी येथे यंदा कार्निव्हल (28 फेब्रुवारी) आणि शिगमो (29 मार्च) हे दोन महत्त्वाचे उत्सव रद्द करण्याचा निर्णय पर्वरी शिगमोत्सव आणि कार्निव्हल समितीने घेतला आहे. सध्या सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

पर्वरीत सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु

पर्वरी (Porvorim) परिसरात सध्या उड्डाणपुलाचे मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत अडथळे येत आहेत. याआधीच जुन्या मांडवी पुलाच्या दुरुस्तीमुळे पणजी आणि पर्वरी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर, मोठ्या प्रमाणावर गर्दी जमणाऱ्या कार्निव्हल आणि शिगमो सारख्या उत्सवांचे आयोजन करणे धोक्याचे ठरु शकते, अशी चिंता आयोजक आणि स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Porvorim Carnival & Shigmo Festival 2025 Canceled
Goa Carnival 2025: धूम कार्निव्हल फेस्टिव्हलची! पर्यटकांना लुभावते गोव्याची संस्कृती

कार्निव्हल आणि शिगमो उत्सव

पर्वरीत दरवर्षी कार्निव्हल आणि शिगमो उत्सव मोठ्या थाटात साजरे होतात. विशेषतः शिगमोच्या मिरवणुकीसाठी गोव्याच्या विविध भागांतून लोक मोठ्या संख्येने येतात. रंगीबेरंगी पारंपरिक नृत्य, ढोलताशे, आकर्षक फ्लोट्स यामुळे हा सोहळा विलोभनीय ठरतो. मात्र, यंदा रद्द करण्याच्या निर्णयामुळे स्थानिक कलाकार, सांस्कृतिक गट, पर्यटक आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी निराशा आहे.

आयोजकांचा पुढील वर्षी शानदार आयोजनाचा निर्धार

पर्वरी शिगमोत्सव आणि कार्निव्हल समितीने स्पष्ट केले की, यंदा सण रद्द करावा लागल्याने खेद वाटतो, परंतु नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवणे प्राधान्य आहे. मात्र, पुढील वर्षी मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरुपात हे सण साजरे करु असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Porvorim Carnival & Shigmo Festival 2025 Canceled
Goa Carnival 2025: एकाच घरातील पाचवा किंग मोमो बनणारा क्लिव्हन म्हणतो, "कार्निव्हल म्हणजे फक्त मौज नाही...."

इतर भागांमध्ये मात्र जल्लोष

गोव्यातील इतर ठिकाणी मात्र कार्निव्हल आणि शिगमो मोठ्या दिमाखात पार पडणार आहेत. पणजी, मडगाव, वास्को, फोंडा आदी ठिकाणी शिगमो आणि कार्निवलच्या तयारीला वेग आला आहे. त्यामुळे पर्वरीत उत्सव रद्द झाला असला तरी, गोव्यातील इतर ठिकाणी पारंपरिक जल्लोष कायम राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com