Porvorim: '..आता तर रुग्णवाहिकाच उलटली'! पुढचा बळी जाईपर्यंत वाट पाहणार का? पर्वरीतील खराब रस्त्यांमुळे नागरिक संतप्त

Porvorim Ambulance Accident: पर्वरीतील मुख्य रस्ता असो किंवा सर्व्हिस रोड, दोन्हीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून दुचाकी- चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे.
Porvorim ambulance accident
Porvorim ambulance accidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्वरीतील रस्त्यांची अवस्था किती दयनीय झाली आहे, याचे जीवंत उदाहरण रविवारी दिसून आले. रुग्णांना वाचवणारी रुग्णवाहिकाच खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर चढली आणि उलटली.

आता रुग्णवाहिकेनेही मान टाकल्यानंतर तरी सरकार जागे होईल का, की पुढचा बळी जाईपर्यंत वाट पाहणार? असा प्रश्न संतप्त लोकांनी या घटनेनंतर उपस्थित केला.

पर्वरीतील मुख्य रस्ता असो किंवा सर्व्हिस रोड, दोन्हीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून दुचाकी- चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांना तर अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर आणल्याचे सांगण्यात येते. पण जेट पॅचर वापरून खड्डे बुजवून चालकांना खड्डेमुक्त रस्ते देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे दिसते. आज खड्डे तसेच असल्याने जेट पॅचर कुठे गेले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पावसाळा असल्यामुळे काम होत नाही, हे कारण जनतेला अनेकदा सांगितले जाते. पण उन्हात किंवा कोरड्या दिवसांत हे काम का केले जात नाही, याचे उत्तर मात्र मिळत नाही.

Porvorim ambulance accident
Porvorim Accident: चिखलमय रस्त्यावरून दुचाकी घसरली, अंगावरून गेला ट्रक; डिचोलीतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

हल्लीच युवकाचा झाला होता मृत्यू

याच महिन्यात या महामार्गावर एका तरुणाचा दुचाकी घसरून मृत्यू झाला होता. आज पुन्हा रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याने, ‘आणखी मोठ्या अपघाताची वाट सरकार पाहात आहे काय’, असा प्रश्न आज लोकांकडून उपस्थित करण्यात आला.

Porvorim ambulance accident
Porvorim: याला रस्ता म्हणायचे का? गोव्यातील 'हा' रोड झालाय मृत्यूचा सापळा; जीवघेणे खड्डे, दलदलीमुळे वाहतुकीची कोंडी

सरकार काय करते? जनतेचा प्रश्‍न

अपघात झाला, की मंत्री, आमदार तातडीने घटनास्थळी येतात. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली जाते. रस्त्यांची पाहणी केली जाते. मोठमोठी आश्वासने दिली जातात. अर्थातच यावेळी कॅमेऱ्यासमोर ‘फोटोसेशन’ करायला ते विसरत नाहीत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी सरकार काय करते, अशा प्रतिक्रिया आज चालकांकडून ऐकायला मिळाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com