Goya Club Seal: परवानग्यांमध्ये घोळ, सुरक्षा नियमांची ऐशीतैशी, वागातोरमधील प्रसिद्ध 'गोया' क्लब सील; गोव्यातील नाईटलाइफला कडक संदेश

Goya Club Sealed: गोव्यातील वागातोर येथील प्रसिद्ध 'गोया' नाईट क्लब संयुक्त अंमलबजावणी समितीने सील केला.
Goya Club Sealed
Goya Club SealedDainik Gomantak
Published on
Updated on

Goya Club Sealed: गोव्यातील वागातोर येथील प्रसिद्ध 'गोया' नाईट क्लब संयुक्त अंमलबजावणी समितीने सील केला. क्लबच्या विविध परवानग्या आणि कामकाजामध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

नियमांचे उल्लंघन आणि त्रुटी

संयुक्त अंमलबजावणी समितीने अचानक 'गोया' क्लबची तपासणी केली. या तपासणीदरम्यान, क्लबच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या परवानग्यांमध्ये अनियमितता असल्याचे समितीला आढळले. क्लबने सरकारी नियम आणि सुरक्षा मानकांचे उल्लंघन केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. क्लबच्या मालकांना आणि व्यवस्थापनाला आपली बाजू स्पष्ट करण्याची योग्य संधी दिली जाईल. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत हा क्लब सीलच राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Goya Club Sealed
CM Pramod Sawant: 'हे पद लोकांच्या कल्याणासाठी, मी लोकांचा मुख्यसेवक'! मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन; Viral Video

'गोया' क्लबवर झालेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे, कारण गोव्यातील 'बर्च बाय रोमिओ लेन' दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब आणि पब्जविरोधात मोठी मोहीम सुरु केली. हडफडे येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर गोव्यातील नाईटलाइफची सुरक्षा व्यवस्था आणि क्लब मालकांचा निष्काळजीपणा यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने स्पष्ट केले की, आता सुरक्षा नियम आणि परवानग्यांच्या बाबतीत कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही.

Goya Club Sealed
CM Pramod Sawant: नोकरीसाठी पहिली संधी अनाथ मुलांना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा

पर्यटन क्षेत्राला कडक संदेश

'गोया' सारख्या उच्चभ्रू आणि लोकप्रिय क्लबवर कारवाई झाल्यामुळे गोव्यातील संपूर्ण पर्यटन आणि नाईटलाइफ क्षेत्राला कडक संदेश मिळाला आहे. क्लबचा व्यवसाय कितीही मोठा असला, तरी नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, हे सरकारने दाखवून दिले. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर क्लब आणि रेस्टॉरंट्सवरही तपासणीचा आणि कारवाईचा दबाव वाढला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असून 'गोया' क्लबचे व्यवस्थापन लवकरच आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. या क्लबवर कायदेशीर कारवाई होऊन ते पुन्हा सुरु होणार की, त्यांच्या परवानग्या रद्द होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com