Knee Transplantation: गोव्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने गुडघा सांधेरोपण, असे आहेत फायदे

Knee Transplantation: भारतात ६-७ वर्षांपूर्वी या रोबोट उपकरणाची सुरवात झाली आणि विविध इस्पितळांमध्ये ६५ रोबोट उपकरणे बसविली आहेत.
Dainik Gomantak
Dainik GomantakDainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या दैनंदिन आयुष्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. वेळीच आपण औषधोपचार केले तर कोणताही आजार बळावत नाही. विज्ञानाच्या मदतीने आता आरोग्य क्षेत्रात नानाविध आविष्कार आपल्याला बघायला मिळतात जे जीवगण्यासाठी उपयुक्त आहेत.

हल्लीच गोव्यातील एका खाजगी इस्पितळात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.रोहन देसाई यांनी यशविरीत्या रोबोटिक पद्धतीने गुडघा सांधेरोपण शस्त्रक्रिया केली. अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया गोव्यात करण्यात आली आहे.

Dainik Gomantak
Goa Ganesh Chaturthi 2023: चवथीचा बाजार आता स्विगीवर! घरातूनच मागवा मोदक, लाडू, नेवरी अन् खूप काही...

जवळपास सर्वच वयस्क व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास असतो आणि वयानुसार शस्त्रक्रिया करणे थोडे कठीण देखील असते. पण आता या रोबोटिक उपकरणाद्वारे हे सहज शक्य आहे. जरी ऑपरेशन रोबोट करत असले तरी डॉक्टरांची भूमिका यात महत्वाची आहे म्हणून त्याला रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणतात.

या शास्त्रक्रियेत डॉक्टरच सगळी माहिती गोळा करतो, त्याची मांडणी करतो, ऑपरेशन ची प्रक्रिया देखील तोच करतो आणि रोबोट कम्प्युटरला जोडल्या गेलेल्या एक कटिंग मशीनच्या सहाय्याने फक्त सर्जरीची जागा व्यवस्थित कापण्याचे काम रोबोट करतो म्हणून त्याला रोबोटिक असिस्टेड सर्जरी असे म्हटले जाते.  

Dainik Gomantak
E Marketing: गणेशचतुर्थीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई-मार्केटची सुरवात

ऑपरेशन करण्याआधी रुग्णाच्या पायाचा CT Scan केला जातो आणि मिळालेली सगळी माहिती पेन ड्राइवद्वारे या रोबोटिक मशीन मध्ये दिली जाते. त्यानंतर त्यात असलेल्या सॉफ्टवेअर मधून सर्जरीच्या आधीच रुग्णाच्या गुडघ्याचा आकाराची अगदी बरोबर माहिती प्राप्त होते.

गुडघ्याचा आकार, त्यामधील अंतर ही सगळी माहिती ऑपरेशनच्या आधीच प्राप्त झाल्याने सर्जरी लगेच पूर्ण होते आणि रुग्णाला बऱ्यापैकी आराम मिळतो. त्याचप्रमाणे सर्जरी रोबोटिक असल्याने डॉक्टरांवरील भार थोडा कमी होतो. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तीन तासात रुग्ण चालू लागतो. साधारण दोन तीन महिन्यात पूर्णपणे बरे होणार रुग्ण या सर्जरीनंतर एक महिन्यात बरे होतात असे डॉक्टर सांगतात.

ही सर्जरी रोबोटिक असल्याने ती करण्यासाठी रुग्णाना नेहमीपेक्षा तीस ते चाळीस हजार रुपये जास्त मोजावे लागतील. अजून गोव्यात हे उपकरण आलेल नाहीये. गोव्यात रोबोटिक कॉन्फरन्स असल्याने हे उपकरण एक खाजगी इस्पितळात आणले होते ज्यावर २ सर्जरी यशस्वीरीत्या करण्यात आल्या. पहिल्या दिवशी एक तर दुसऱ्या दिवशी दोन्ही गुडघ्यांवर एकत्रितपणे सर्जरी झाल्या.

पारंपारिक पद्धतीपेक्षा शक्य असल्यास रोबोटिक ऑपरेशन करायचे कारण याचा फायदा रुग्णाला जास्त असतो. या उपकरणावर वर्षाला जवळपास १००० सर्जरी यशस्वीपणे करू शकतो आणि ह्या क्षेत्रामध्ये हेच पुढील भविष्य आहे.

भारतात ६-७ वर्षांपूर्वी या रोबोटची सुरवात झाली आणि आता ३-४ विविध कंपन्यांचे रोबोट भारतात उपलब्ध आहे. आत्तापर्यंत देशात विविध इस्पितळात ६५ रोबोट उपकरणे बसविली आहेत. फक्त अशा उपकरणामुळे डॉक्टर ना सर्जन असल्याचा फील कमी होतो असे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोहन देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com