Pooja Naik: 'ती स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेतेय'; पूजा नाईक प्रकरणात मंत्री ढवळीकर यांचं मोठं विधान

Sudin Dhavalikar Statement On Pooja Naik: गोव्यात सध्या गाजत असलेल्या पूजा नाईक प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावे चर्चेत असताना राज्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मोठे आणि स्पष्ट विधान केले .
Sudin Dhavalikar
Power Minister Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

Pooja Naik Job Scam: गोव्यात सध्या गाजत असलेल्या पूजा नाईक प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावे चर्चेत असताना राज्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मोठे आणि स्पष्ट विधान केले आहे. पूजा नाईक हिच्या दाव्यांवर आपला विश्वास नसल्याचे सांगत, ती ही नावे स्वतःला वाचवण्यासाठी किंवा एखाद्याला लक्ष्य करण्यासाठी घेत असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री निर्णय घेतील: ढवळीकर

या प्रकरणावर बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी या घोटाळ्याची चौकशी आधीच सुरु केली आहे. तपास पूर्ण झाल्यावर तेच या प्रकरणावर अंतिम निर्णय घेतील.

Sudin Dhavalikar
Pooja Naik: 'पूजा'कडून पैसे घेणारे मंत्री, IAS अधिकारी, अभियंता कोण? ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पेटणार; मुख्‍यमंत्र्यांनी दिली तपासाची हमी

पूजा नाईकच्या दाव्यांवर संशय

पूजा नाईककडून चौकशीत काही नावे समोर येत असल्याच्या चर्चेवर ढवळीकर यांनी थेट संशय व्यक्त केला. ते म्हणाले, "पूजा नाईक जी काही नावे घेत आहे, त्यावर माझा विश्वास नाही. ती फक्त स्वतःला वाचवण्यासाठी इतरांची नावे घेत असावी किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीला लक्ष्य करत असावी, असे मला वाटते." या विधानामुळे, पूजा नाईक प्रकरणाला आता केवळ आर्थिक घोटाळ्याची नाही, तर राजकीय संघर्षाचीही किनार मिळाल्याचे दिसत आहे.

Sudin Dhavalikar
Pooja Naik: '17 कोटी परत द्या, अन्यथा..'! पूजा नाईक ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मंत्री, IAS अधिकारी, अभियंत्‍याची नावे जाहीर करणार?

दोषी आढळल्यास कठोर शिक्षा व्हावी

या घोटाळ्याची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा ढवळीकर यांनी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, तपासानंतर या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, मग तो कितीही मोठा असो, त्याला कोर्टाने कठोर शिक्षा करावी. या नोकरी घोटाळ्यामुळे गोव्यातील (Goa) राजकारण चांगलेच तापले असून, तपास यंत्रणांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com