Pooja Naik: 'पूजा'कडून पैसे घेणारे मंत्री, IAS अधिकारी, अभियंता कोण? ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पेटणार; मुख्‍यमंत्र्यांनी दिली तपासाची हमी

Cash For Job: राज्‍यातील युवक–युवतींना सरकारी नोकऱ्या देण्‍याचे आमिष दाखवून पूजा नाईकने त्‍यांना लाखो रुपयांना गंडवल्‍याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी गाजले होते.
Pooja Naik
Pooja Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नोकऱ्या देण्‍यासाठी १७ कोटी रुपये दिलेल्‍या मंत्री, आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या (पीडब्‍ल्‍यूडी) अभियंत्‍याला पैसे परत करण्‍यासाठी या प्रकरणातील मुख्‍य आरोपी पूजा नाईकने सोमवारपर्यंतची मुदत दिलेली होती. परंतु, त्‍याआधीच रविवारी क्राईम ब्रँचने तिला बोलावून तिची सुमारे पाच तास चौकशी केली.

त्‍याआधी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही पेडण्‍यात पत्रकारांशी बोलताना याप्रकरणी पूजाने केलेल्‍या वक्तव्‍यांची नव्‍याने चौकशी करण्‍याची हमी दिली होती.

राज्‍यातील युवक–युवतींना सरकारी नोकऱ्या देण्‍याचे आमिष दाखवून पूजा नाईकने त्‍यांना लाखो रुपयांना गंडवल्‍याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी गाजले होते. यासंदर्भातील तक्रारींनंतर पोलिसांनी पूजा नाईक हिला अटक करून तिची चौकशी केल्‍यानंतर या टोळीत काही सरकारी कर्मचाऱ्यांचाही हात असल्‍याचे उघडकीस आले.

त्‍यानुसार पोलिसांनी सर्वच संशयितांना अटक केली होती. पण, पूजासह अटकेत असलेल्‍या सर्वांचीच जामिनावर सुटका झाली.

हे प्रकरण शमलेले असतानाच पूजा नाईक हिने तीन दिवसांपूर्वी म्‍हापशात बोलताना, ६०० जणांना सरकारी नोकऱ्या मिळवून देण्‍यासाठी आपण मंत्री, आयएएस अधिकारी तसेच ‘पीडब्‍ल्‍यूडी’ अभियंत्‍याला १७ कोटी रुपये दिल्‍याचा दावा केला.

संबंधितांनी चोवीस तासांत आपल्‍याला हे १७ कोटी रुपये परत न केल्‍यास त्‍यांची नावे उघड करण्‍याचा आणि याबाबतचे पुरावे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करण्‍याचा इशाराही तिने दिला होता. पूजाच्‍या या खळबळजनक दाव्‍यामुळे राज्‍याच्‍या राजकारणात आणि भाजपात खळबळ माजली असून, पूजाकडून पैसे घेणारा मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंता कोण? असा प्रश्‍‍न अनेकजण विचारत आहेत.

Pooja Naik
Pooja Naik: '17 कोटी परत द्या, अन्यथा..'! पूजा नाईक ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मंत्री, IAS अधिकारी, अभियंत्‍याची नावे जाहीर करणार?

पूजाला अचानक बोलावल्‍यामुळे तर्क-वितर्क

पैसे दिलेल्‍या मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याला पैसे परत करण्‍यासाठी पूजाने सोमवारपर्यंतची मुदत दिलेली होती. त्‍याआधीच क्राईम ब्रांचने रविवारीच तिला चौकशीसाठी बोलावून सुमारे पाच तास तिची चौकशी केली.

त्‍यामुळे पूजा सोमवारी नावे उघड करणार की नाही? याकडे सर्वांच्‍याच नजरा लागून आहेत. त्‍यातच आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनीही या प्रकरणात मंत्रिमंडळातील मंत्री सहभागी नसल्‍याचे स्‍पष्‍ट केल्‍यास आपण त्‍याचे नाव उघड करून पुरावेही सादर करू असे आव्‍हान दिल्‍याने सरदेसाईंच्‍या पुढील भूमिकेकडेही जनतेचे लक्ष आहे.

Pooja Naik
Pooja Naik Case: त्या पुलिसाक 'पूजा'नूच लायिल्लो कामाक! Cash For Job वरुन सरदेसाईंचा घणाघात; Watch Video

काय म्‍हणाले मुख्‍यमंत्री ...

१. पूजा नाईकच्या दाव्यानुसार पुन्हा एफआयआर दाखल होईल आणि चौकशीही सुरू होईल.

२. तिला माझ्याकडे येण्याची गरज नाही, नावे आणि पुरावे पोलिसांना द्यावेत.

३. पूजा नाईकने घेतलेल्या मंत्र्यांची व अधिकाऱ्यांचीही चौकशी होईल. पैसे घेतल्‍याचे सिद्ध झाल्‍यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

४. सरकार पारदर्शक आहे; पूजा नाईकने सार्वजनिक आरोप टाळावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com