Goa Politics: खरी कुजबुज; पोलिस अशी चौकशी करतील का?

Khari Kujbuj Political Satire: पूजा नाईक हिने पैशांच्या बदल्यात नोकरी प्रकरणात आरोप केल्यानंतर चर्चेत असलेली नावे उच्चारण्याची हिंमत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखवली.
Khari Kujbuj Political Satire
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

ही चौकशी होईल का?

बेछूट आरोपांमुळे चर्चेत आलेली पूजा नाईक ही गेल्या वर्षी जामिनावर सुटली. आता ती अचानक आरोप करू लागली आहे. गेले वर्षभर ती कोणा-कोणाच्या संपर्कात होती. आता ती चर्चेत येण्याआधी तिच्या कोण संपर्कात आले होते का, याची चौकशी होणार का, अशी विचारणा होऊ लागली आहे. पूजा हिचा बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे, असा आरोप मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केल्याने हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. खरेच पोलिस अशी चौकशी करतील का, हा मुद्दा चर्चेला आला आहे. ∙∙∙

गिरीश चोडणकर उवाच!

पूजा नाईक हिने पैशांच्या बदल्यात नोकरी प्रकरणात आरोप केल्यानंतर चर्चेत असलेली नावे उच्चारण्याची हिंमत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखवली. यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी पाटकर यांचे जाहीरपणे कौतुक केले आहे. त्यांनी पाटकर यांच्या माहितीचे स्रोत पक्के असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. चोडणकर यांनी हे खोचकपणे केले, की खुल्या मनाने हे समजण्‍यास वाव नाही. तरीही खुल्या दिलाने ही स्तुती आहे, असे मानले तरी पाटकर यांचा स्रोत कोण हाही चर्चेचा विषय ठरू शकतो. ∙∙∙

पालेकरांकडून दुसऱ्यांदा मागणी

कॅश फॉर जॉब प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने ज्यांना पैसे दिले, त्यांची नावे आज प्रसारमाध्यमांसमोर येऊन सांगितली. पूजाला प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पूजा नाईकने या प्रकरणातील माहिती सांगितल्यानंतर पालेकर यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांना निलंबित करण्याची मागणी केली. शिवाय पूजाच्या जबाबात फेरफार करणाऱ्या गुन्हे शाखेचे उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांनाही निलंबित करण्याची मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी भूखंड बळकाव प्रकरणातील संशयित सुलेमान सिद्दिकीच्या प्रकरणात सुलेमानचा दुसरा व्हिडिओ हा पोलिसांच्या दबावाखाली चित्रित केला होता, त्यावेळीही पालेकर यांनी गुप्ता आणि हळर्णकर यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. पण त्यावेळीही पालेकरांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. आता पालेकरांनी पुन्हा ‘कॅश फॉर जॉब'' प्रकरणी दोघांच्या निलंबनाची मागणी केली असल्याने ती मान्य होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल! ∙∙∙

दाबोळीचा विस्तार

गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या विस्ताराचे काम पूर्ण झालेले असून येत्या डिसेंबरपर्यंत म्हणजेच पुढील महिना अखेरपर्यंत तो पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, असे दाबोळी विमानतळाचे नवे संचालक आकाश दीप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जाहीर केले असल्याने दाबोळीच्या भवितव्याबाबतच्या सर्व शंका कुशंकांना पूर्णविराम मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. गोव्यात मोपा विमानतळ झाल्या पासून अनेकांना दाबोळी आता बंद पडणार ,अशी भीती वाटत होती, की कोणी त्यांच्या मनात ती भीती कालवत होते ते कळायला मार्ग नाही. केवळ विरोधी खासदारच नव्हे काही आमदारही जाहीरपणे तशी भीती वरचेवर व्यक्त करत होते. दाबोळीत हजारो कोटींची गुंतवणूक केल्यावर तो बंद केला जाणार नाही, हे कोणालाही पटण्यासारखे आहे. पण जाणून बुजून झोपेचे सोंग घेणाऱ्यांना ते कोण सांगणार, असा प्रश्‍न या निमित्ताने अनेकांना पडला खरा!. ∙∙∙

काँग्रेसची भाजपमध्ये धडक

भाजपकडून कोणत्याही गोष्टीचे खापर नेहरू व कॉंग्रेसवर फोडण्याची फॅशन झाली आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्यासाठी शुक्रवारी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क भाजप कार्यालय गाठले. त्यांनी भाजपचे कार्यालय सचिव सुधीर पार्सेकर यांच्याकडे ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पंडित जवाहरलाल नेहरू लिखित पुस्तकाच्या प्रती सुपूर्द केल्या. आता भाजप याची परतफेड कशी करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'पणजीचे आमदार लोकांचे प्रश्‍न ऐकत नाहीत'! पर्रीकरांचे टीकास्त्र; पार्किंग समस्येवरुन साधला निशाणा

तयारी गांभीर्याने घेणार?

गोवा आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचे (इफ्‍फी) कायमचे केंद्र बनले आहे. त्‍यामुळे ‘इफ्‍फी’ जवळ आला की, जगभरातील चित्रपट रसिकांचे लक्ष गोव्‍याकडे लागते आणि पायही गोव्‍याकडे वळतात. दरवर्षी ‘इफ्‍फी’चे उद्‍घाटन बांबोळी येथील डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्‍टेडियममध्‍ये होत होते. यंदा मात्र पणजीतील गोमेकॉच्‍या जुन्‍या इमारतीसमोर उद्‍घाटन करण्‍याचे सरकारने निश्‍चित केले आहे. पण, गेल्‍या काही वर्षांपासून महोत्‍सव संपेपर्यंत ‘इफ्‍फी’ परिसरात तयारीच सुरू असल्‍याचे दिसून आले आहे. त्‍यामुळे आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाच्‍या तयारीचा विषय सरकार यंदा तरी गांभीर्याने घेणार की, ‘ये रे माझ्‍या मागल्‍या’च सुरू राहणार? असा प्रश्‍‍न राज्‍यातील चित्रपट रसिकांकडून उपस्‍थित केला जात आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसची सारी मदार महिलांवरच!

अमितच्या हाती नारळ दिला !

‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी मराठीत एक म्हण आहे. मांद्रेचे माजी पंच अमित सावंत हे हल्लीच गोवा फॉरवर्ड पक्षात सामील झाले होते. मात्र, त्यांचा संबंध भू माफियांशी असल्याचा आरोप करीत गोवा फॉरवर्ड पक्षाने त्यांच्या हाती नारळ देऊन पक्षातून हकालपट्टी केली. काही दिवसांपूर्वीच अमित यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचा नारळ हातात घेतला होता. विजय सरदेसाईनी काही दिवसांतच त्यांच्या हाती नारळ दिला. गोवा फॉरवर्ड पक्षातून हकालपट्टी झाल्यावर लगेच काँग्रेस पक्षाने अमित सावंत यांना पक्षात प्रवेश दिला. ‘सांडले पाडिल्ले गोरुं काँग्रेसच्या गोठ्यात’ असे म्हणत नेटिझन टीका करीत आहेत. अमित काही दिवसापूर्वी सांगत होते, की भाजपचा मोठा नेता गोवा फॉरवर्ड पक्षात सामील होणार. मात्र, बिचारे अमित स्वतःच गोवा फॉरवर्ड पक्षातून ‘बॅकवर्ड’ झाले.अमित सावंत मुख्यमंत्र्यांपासून सरकारातील नेत्यांवर आरोप करायचे. आता त्यांच्यावरच भू माफियांचे साथीदार असल्याचा आरोप होत आहे, आता या आरोपानंतर अमितच्या पत्नीला जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत जर काँग्रेसची उमेदवारी मिळाली, तर भू माफियांच्या आरोपांची तोफ त्यांना झेलावी लागणार हे निश्चित. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com