Pooja Naik: "मी तेव्हा आमदारच नव्हतो", "माझं नाव असेल तर शोधा"; नोकरी घोटाळ्यावर मंत्र्यांच्या सावध प्रतिक्रिया

Pooja Naik cash for job scam Goa: घोटाळ्याप्रकरणी प्रमुख आरोपी पूजा नाईक हिने केलेल्या स्फोटक आरोपांमुळे मंत्र्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे
Pooja Naik case
Pooja Naik caseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील बहुचर्चित 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्याप्रकरणी प्रमुख आरोपी पूजा नाईक हिने केलेल्या स्फोटक आरोपांमुळे मंत्र्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. पूजा नाईकने १७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्यांचा सहभाग असल्याचा दावा केल्यानंतर, पत्रकारांनी सत्ताधारी पक्षातील दोन मंत्र्यांनी प्रश्न केला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले.

मंत्री हळर्णकर यांचा थेट सवाल

नोकरी भरती घोटाळ्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, भाजपचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी थेट या प्रकरणावर भाष्य करणे टाळले. त्यांनी उलट मीडियालाच प्रश्न विचारला, "माझे या प्रकरणात काय काम आहे? या विषयावर मला काहीही टिप्पणी करायची नाही. पूजा नाईकच्या नवीन निवेदनात माझे नाव आले आहे की नाही, हे तुम्हीच शोधून काढा." 'माझा यात सहभाग आहे की नाही, हे तपासा', अशी प्रतिक्रिया देत हळर्णकर यांनी स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

Pooja Naik case
Pooja Naik Case: त्या पुलिसाक 'पूजा'नूच लायिल्लो कामाक! Cash For Job वरुन सरदेसाईंचा घणाघात; Watch Video

'२०१४ मध्ये मी आमदार नव्हतो' - मंत्री फळदेसाई

सामाजिक कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. सांगे मतदारसंघाचे आमदार असलेल्या फळदेसाई यांनी म्हटले की, जर पूजा नाईकने लाच घेतल्याबद्दल औपचारिकपणे त्यांचे नाव घेतले तरच ते या विषयावर बोलतील.

फळदेसाई पुढे म्हणाले की, कथित घोटाळा २०१४ मध्ये सुरू झाला तेव्हा मी अधिकृतपणे निवडून आलेला आमदार नव्हतो, त्यामुळे या घोटाळ्यावर माझे मत देणे योग्य होणार नाही. त्यांनी स्वतःला घोटाळ्याच्या आरंभिक कालावधीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

नाईकच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे आदेश

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूजा नाईकने पूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याच्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलिसांना याप्रकरणी नवीन एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नवीन तक्रारीत कोणाचेही नाव घेतल्यास, त्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com