Pooja Naik Case: त्या पुलिसाक 'पूजा'नूच लायिल्लो कामाक! Cash For Job वरुन सरदेसाईंचा घणाघात; Watch Video

Vijai Sardesai: असा मंत्री आपल्‍या मंत्रिमंडळात नाही हे अगोदर मुख्‍यमंत्री सावंत यांनी जाहीर करावे. त्‍यानंतरच आपण त्‍याचे नाव आणि पुरावेही समोर आणू, असे सरदेसाई म्‍हणाले.
Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला पूजा नाईक हिनेच नोकरी लावली आहे. या प्रकरणात गुंतलेला मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहे. मुख्‍यमंत्री सावंत यांनी असा मंत्री मंत्रिमंडळात नाही हे स्‍पष्‍ट करावे. त्‍यानंतरच आम्‍ही त्‍याचे नाव आणि पुरावेही सादर करू, आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी शनिवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदे दरम्‍यान स्‍पष्‍ट केले.

सरदेसाई यांनी या प्रकरणात गुंतलेला मंत्री अजूनही मंत्रिमंडळात असल्‍याचा दावा केला. तसे असेल तर विरोधी पक्षांमधील अनुभवी आमदार म्‍हणून तुम्‍ही त्‍यांचे नाव का जाहीर करीत नाही असा सवाल पत्रकारांनी केला असता, असा मंत्री आपल्‍या मंत्रिमंडळात नाही हे अगोदर मुख्‍यमंत्री सावंत यांनी जाहीर करावे. त्‍यानंतरच आपण त्‍याचे नाव आणि पुरावेही समोर आणू, असे सरदेसाई म्‍हणाले.

Vijai Sardesai
Pooja Naik: '17 कोटी परत द्या, अन्यथा..'! पूजा नाईक ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मंत्री, IAS अधिकारी, अभियंत्‍याची नावे जाहीर करणार?

‘ती’ पदेच रद्द करायला हवी होती!

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण हा साखळी मार्केटिंगचा प्रकार होता. पूजा नाईक आता मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याला दिलेले पैसे मागत आहे. परंतु, हे पैसे आले म्‍हणजे सरकारी नोकरीसाठी त्‍याकाळी पात्र असलेल्‍या युवक–युवतींना न्‍याय मिळाला असे होत नाही.

Vijai Sardesai
Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

पूजा नाईकच्‍या म्‍हणण्‍यानुसार ज्‍या ६०० पदांसंदर्भात तिने पैसे दिले होते, ती पदेच सरकारने रद्द करणे गरजेचे होते, असेही विजय सरदेसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories


Suhana Naik Arrest news
Subhash Naik Death Case
vijai sardesai warns goa govt
Pooja Naik Cash for Job Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com