Breaking: फोंडयाचे पहिले आमदार Gajanan Raikar यांचे निधन

गोवा मुक्तीच्या स्वातंत्र्य लढ्यात रायकरांचा होता मोठा सहभाग
Gajanan Raikar
Gajanan Raikar Dainik Gomanta
Published on
Updated on

गोव्यातल्या फोंडयाचे पहिले आमदार आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गजानन रायकर (Gajanan Raikar) 85 वर्षे, यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र पराग हे असून उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 1963 साली ते फोंडा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. ते लेखक आणि कवी असून त्यांच्या नावावर अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या कुटुंबियाकडून मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना प्रथम हॉस्पिसीयो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा शीर तुटल्याचे कळून आल्यावर त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले. पण त्यांच्या वयामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अशक्य असल्याचे त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू असताना दुपारी त्यांचे निधन झाले.

Gajanan Raikar
Pernem: तोरसे पेडणे मार्गावर अपघात होऊन कुडाळ येथील युवक जागीच ठार

रायकर हे नामांकित कवीही होते. त्यांनी मराठी व कोंकणी भाषेत कित्येक कविता केल्या. गोवा मुक्ती लढ्यात त्यांची गीते स्फुर्ती देणारी होती. त्यांनी लिहिलेले ' रोवू चला पणजीवर विजयी झेंडे ' हे गीत प्रेरणा गीत ठरले होते. मुक्तीलढ्यात काम करताना त्यांना अटकही झाली होती क्रूरकर्मा आजेंत मोंतेरो यांच्याकडून त्यांना जबर मारहाणही झाली होती.

रायकर हे गोवा मुक्तीनंतर राजकारणात सक्रिय होते. 1963 झालेल्या गोवा विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत ते प्रजा समाजवादी पक्षाच्या उमेदवारीवर फोंड्यातून आमदार म्हणून जिंकून आले होते. त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दुःख व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com