अपघातात सापडलेले वाहन
अपघातात सापडलेले वाहनDainik Gomantak

Pernem: तोरसे पेडणे मार्गावर अपघात होऊन कुडाळ येथील युवक जागीच ठार

तोरसे - येथिल बीएड कॉलेज नजीकझालेल्या मोटारसायकल व टेम्पो यांच्यातील अपघातात (Accident ) कुडाळ येथील योगेश परब 27 हा जागीच ठार झाला.
Published on

मोरजी: तोरसे - येथिल बीएड कॉलेज नजीकझालेल्या मोटारसायकल व टेम्पो यांच्यातील अपघातात (accident) कुडाळ येथील योगेश परब 27 (Yogesh Parab, 27) हा जागीच ठार झाला. या अपघातात कुडाळ येथील युवक जागीच ठार झाला आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) हा अपघात घडला आहे. या अपघातात युवक जागीच ठार झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

अपघातात सापडलेले वाहन
Goa Recruitment: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती

मृत तरुणाचं नाव योगेश परब (वय वर्षं 27) असल्याचं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून समोर आली . तो गोव्यात कामानिमित्त येत असताना वाटेतच काळाने त्याला गाठलंय. मुंबई-गोवा महामार्गावर तोरसे पेडणे इथे समोरुन येणाऱ्या टेम्पोने योगेशच्या बाईकला जोराची धडक दिल्याने हा अपघात झालाय. ही धडक एवढी जोराची होती, की यात योगेशचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात सापडलेले वाहन
नोकऱ्या असूनही गोमंतकीय बेरोजगारच

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल

घटनास्थळी दाखल झाले. तसंच पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा पोलिस तपास सुरुराज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत. आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com