Death body
Death body Dainik Gomantak

जंगलात सापडला महिलेचा मृतदेह; कुडचडे पोलिसांकडून तपास सुरू

शवविच्छेदन अहवालातून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Published on

सावर्डे: सावर्डे ते गुड्डेमळ मुख्य रस्त्याच्या बाजूला जंगलात महिलेचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह रूपा पारकर (वय 55) असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपास करून
मृतदेह शवविच्छेदनास पाठवला होता.

Death body
गोव्यात स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देणार: माविन गुदिन्हो

शवविच्छेदन अहवालातून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कुडचडे पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसर, मृत महिला नातेवाईकांसोबत करमणे येथे राहत होती. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पोलिस खून कुणी केला याचा कसून तपास करत आहेत.
संबंधित महिलेच्या मालमत्तेची काही दिवसांपूर्वी विक्री झाली होती. त्यातून तिला बरेच पैसे मिळाले होते. "या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल आणि आरोपीला अटक करण्यात येईल," असे कुडचडे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com