Ponda: फोंड्यातील वाहतूकदार बैठकीत वाहतूक आयोगाची मागणी

Ponda Transporters Commission: विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी विविध निर्णय घेण्याची आवश्‍यकता
Ponda Transporters Commission: विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी विविध निर्णय घेण्याची आवश्‍यकता
Ponda TransportersDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: वाहतूकदार आणि चालकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी विविध निर्णय घेण्याची आवश्‍यकता असून त्यासाठी वाहतूक आयोगाची मागणी फोंड्यातील बैठकीत करण्यात आली. यावेळी फोंड्यासह इतर भागातील वाहतूकदार उपस्थित होते. एस. के. भारद्वाज यांनी सूत्रसंचालन केले.

फोंड्यात झालेल्या या बैठकीला वाहतूकदार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. के. शर्मा, संघटनमंत्री पुण्यातील राकेश काटीवाल अध्यक्षस्थानी होते. बैठकीला फोंडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अशोककुमार तसेच बिजेंदर सिंह यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

आर. के. शर्मा म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात वाहतूकदार हा प्रमुख घटक आहे; पण सरकारकडून या घटकाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या घटकाची सध्या दयनीय अवस्था झाली असून सरकारच्या वाहतूक पॉलिसीमुळे वाहतूकदार आणि चालक मेटाकुटीला आले आहेत. वाहनचालकांना अनेक समस्या सतावत आहेत.

या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. देशाची आर्थिक घडी वाहतुकीच्या दृष्टीने योग्यरीतीने घालण्यासाठी सरकार आणि वाहतूकदार यांच्यात समन्वय असायला हवा, असे सांगून शक्य तेवढ्या लवकर वाहतूक आयोगाची स्थापना करायला हवी, असे आर. के. शर्मा यांनी सांगितले.

Ponda Transporters Commission: विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी विविध निर्णय घेण्याची आवश्‍यकता
Transport Department: ‘स्पीड गव्हर्नर’ तपासणीची वाहतूक खात्‍याला उपरती

गणेश शर्मा अध्यक्ष

यावेळी गोव्याच्या वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष म्हणून गणेश शर्मा यांच्या नावाला पसंती देण्यात आली. गणेश शर्मा यांनी येत्या ६ सप्टेंबरला वाहतूक दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com