Transport Department: ‘स्पीड गव्हर्नर’ तपासणीची वाहतूक खात्‍याला उपरती

Transport Department : नियमोल्‍लंघन करणाऱ्या ‘रेंट ए कॅब’ना चाप
Transport Department
Transport Department Dainik Gomantak
Published on
Updated on

Transport Department:

राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक खाते अधिक सक्रिय झाले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने चालकांना जरब बसविण्यासाठी मालवाहू वाहनांसह ‘रेंट ए कॅब’ना स्पीड गव्हर्नरची सक्ती असल्याने त्यांची तपासणी करून येत्या 11मार्चपर्यंत कारवाईचा कृती अहवाल सादर करण्याचा आदेश वाहतूक संचालक पी. प्रविमल अभिषेक यांनी जारी केला आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाला स्पीड गव्हर्नर बसविणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक टॅक्सीचालक वाहतूक खात्याचे फिटनेस प्रमाणपत्र किंवा नूतनीकरण होईपर्यंत स्पीड गव्हर्नर बसवितात. मात्र, नंतर ते बंद करतात.

भाडेपट्टीवर रेंट ए कॅब घेणारे बहुतांश पर्यटक मद्यप्राशन करतात. त्यामुळे या कॅबवर मालकाने खासगी चालकाची नेमणूक केल्यास अपघात टाळता येतील, अशी सूचना माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी हल्लीच केली होती,

Transport Department
Watermelon Benefits: कलिंगड खाण्याचे नेमके फायदे काय; उन्हळ्यात का खातात कलिंगड?

एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत होता. त्याने दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. या अपघाताला आठवडाही उलटत नाही, तोवर आज बांबोळी येथे रेंट ए कार चालकाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातातील जखमी दुचाकीस्वाराला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांची निष्क्रियताच कारणीभूत

टॅक्सींची वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी केली जात नाही. त्यामुळे मालवाहू वाहनांसह रेंट ए कॅबला स्पीड गव्हर्नर बसविले का, याची खातरजमा अधिकाऱ्यांना करण्यास सांगितले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच रेंट ए कॅब भाडेपट्टीवर घेऊन पर्यटक बेफामपणे वाहने चालवत असून वारंवार अपघात घडत आहेत.

Transport Department
Mopa Airport: दाबोळीवरील विमाने मोपाकडे वळविण्यासाठी केंद्रावर दबाव

तर हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी रेंट ए कॅब व बाईकना स्पीड गव्हर्नर सक्तीचे तसेच त्याची अधूनमधून तपासणी करण्याची मागणी केली होती. जुन्या मांडवी पुलावर रेंट ए कॅबचालक

12 ब्‍लॅक स्‍पॉट हटविणार; 90 ठिकाणी सीसीटीव्‍ही

रस्‍ते अपघात कमी करण्‍यासाठी वाहतूक खाते प्रयत्‍न करत आहे. तूर्त १२ ठिकाणचे ब्‍लॅक स्‍पॉट हटविण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू असून ९० ठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे तैनात करण्‍यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com