Ponda News : पेशव्यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचावा! सुदिन ढवळीकर

Ponda News : गो. रा. ढवळीकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
Ponda
PondaDainik Gomantak

Ponda News :

फोंडा, स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करणाऱ्या महापराक्रमी आणि मुत्सद्दी पेशव्यांचा इतिहास आजच्या युवा पिढीपर्यंत पोचवणे आवश्‍यक असून त्यादृष्टीने कार्य व्हावे, असे मत गो. रा. ढवळीकर यांच्या ‘स्वराज्याचे सुराज्य करणारे मुत्सद्धी आणि महापराक्रमी पेशवे’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

फोंड्यात आज (रविवारी) विश्‍व हिंदू परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वीजमंत्री सुदिन ढवळीकर, प्रमुख वक्ते प्राचार्य अनिल सामंत, ज्येष्ठ पत्रकार सागर जावडेकर, ॲड. सरेश लोटलीकर तसेच लेखक गो. रा. ढवळीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले की, इतिहास हा जिवंत राहिला पाहिजे, आणि तो सर्वांपर्यंत पोचला पाहिजे. विशेषतः नवीन पिढीला इतिहास माहिती असणे गरजेचे असून पेशव्यांनी जरी राज्य चालवले तरी मराठ्यांचे राज्य अशी ओळख लेखक गो. रा. ढवळीकर यांनी करून दिली आहे, त्यामुळे मराठेशाहीची ओळख किती प्रगल्भ आहे हे दिसून येते.

Ponda
Goa's Top News: दूधसागर, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक, अपघात; राज्यातील ठळक बातम्या

प्राचार्य अनिल सामंत म्हणाले की, गो. रा. ढवळीकर यांनी हे पुस्तक लिहिताना बारकाईने अभ्यास केला आहे. पत्रकार सागर जावडेकर म्हणाले की, उत्कृष्ट साहित्य निर्मितीला सहज वाचक मिळत असतात, नेमके हेच सूत्र ढवळीकर यांनी पकडले असून एक समग्र असा पेशव्यांचा इतिहास या पुस्तकातून पुढे आणला आहे. प्रास्ताविक नीतिन ढवळीकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com