Teacher Transfer Case : विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; पालक आपल्या मागणीवर ठाम

Teacher Transfer Case : लवकरच प्रथम चाचणी परीक्षा होणार आहे, त्यासाठी मुलांना आवडीचे शिक्षण देणे गरजेचे आहे.
 Government Primary School Old Market Ponda
Government Primary School Old Market Ponda Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा, शिक्षिकेच्या बदलीच्या निषेधार्थ येथील सरकारी प्राथमिक विद्यालय जुना बाजारच्या विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार टाकला. त्या शिक्षिकेला पुन्हा त्याच शाळेत सेवेत रूजू करण्याची मागणी येथील पालकांनी केली आहे.

शिक्षिका न आल्यामुळे शनिवारी एकही विद्यार्थी शाळेत आला नाही, जोपर्यंत शाळेच्या शिक्षिकेची केलेली बदली रद्द केली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे येथील पालकांनी सांगितले. पालक आपल्या मागणीवर ठाम आहेत. शिक्षण खाते निर्णय मागे घेईपर्यत शाळा बंद राहाणार असून विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होणार आहे.

आत्ता सरकार या प्रश्नावर कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळेतून बदली झालेल्या शिक्षिकेला पुन्हा सेवेत घ्यावे, अशी मागणी पालक आणि ११० विद्यार्थ्यांनी केली आहे.

शुक्रवारी फोंडा येथील भागशिक्षणधिकारी या कार्यालयावर मोर्चा काढून बदली रद्द करावी, अशी मागणी केली होती. या शिक्षिकेने विद्यार्थ्यांची संख्या वाढवली होती. या कष्टाळू शिक्षिकेच्या बदलीला विरोध करणारे निवेदनही शुक्रवारी देण्यात आले होते. त्यांनी तिच्या बदलीमध्ये राजकारणी लोकांचा हात असल्याचा आरोपही केला होता.

काल पालकांनी भागशिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदन दिले होते. परंतु त्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.

शिवाय शिक्षिकेची बदलही रद्द केली नाही, त्यामुळे संतप्त पालकांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, कारण मुलांच्या भवितव्याचा प्रश्‍न आहे. लवकरच प्रथम चाचणी परीक्षा होणार आहे, त्यासाठी मुलांना आवडीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी सदर शिक्षिकेची बदली थांबवावी, अशी मागणी पालकांतर्फे करण्यात येत आहे.

 Government Primary School Old Market Ponda
Dominic D'Souza: डॉमिनिक विरोधातील 'तडीपार' प्रकरणाची पुढील सुनावणी होणार 'या' दिवशी

उद्या निर्णय शक्य!

या इमारतीतून सुरू असलेल्या हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी प्राथमिक विद्यार्थ्यांना शौचालयाची सुविधा वापरण्याची परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असल्याचा ठपकाही पालकांनी ठेवलेला आहे.

सोमवार २९ रोजी या प्रश्नावर संबंधित खाते कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com