Dominic D'Souza: डॉमिनिक विरोधातील 'तडीपार' प्रकरणाची पुढील सुनावणी होणार 'या' दिवशी

Dominic D'Souza Case: त्यांच्याविरुद्ध आत्तापर्यंत आयपीसीच्या विविध कलमांतर्गत तब्बल सहा प्रकरणे नोंदवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Dominic D’Souza
Dominic D’SouzaDainik Gomantak

Pastor Dominic D'Souza Case: शिवोली येथील फाइव्ह पिलर चर्चचे पास्टर डॉमिनिक डिसोझा आणि त्यांची पत्नी जोआना मस्करेन्हास यांच्या विरोधात राज्यातील धार्मिक शांतता आणि सलोखा धोक्यात आला असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.

त्यावरुनच त्यांना उत्तर गोव्यातून 'तडीपार' करणार का या प्रकरणावरुन आज शुक्रवारी म्हणजेच (12 जानेवारी रोजी) दुपारी 3:30 वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले होते.

डॉमिनिक यांना उत्तर गोव्यातून 'तडीपार' करणार का याबाबत बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारीला होणार आहे.

Dominic D’Souza
Candolim Murder Case: अखेर सूचना घटनास्थळी जाण्यास तयार, सिकेरीतील 'त्या' हॉटेलवर रिक्रिएट होणार घटनाक्रम

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिल्यास आपल्या असे समजते की, डॉमनिक आणि जोआना हे दोघेही ड्रग्ज आणि जादूटोणा, हाय व्हॉल्युम म्युझिक लावून गोंधळ घालणे, लोकांच्या धार्मिक भावना दुखावणे यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे मागील काही प्रकरणांमधून समोर आले आहे.

त्यांच्या या अशा कामांमुळे उत्तर गोवा जिल्ह्यातील सामान्यांचे जीवन विस्कळीत झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच त्यांच्याविरुद्ध आत्तापर्यंत आयपीसीच्या विविध कलमांतर्गत तब्बल सहा प्रकरणे नोंदवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान फाइव्ह पिलर चर्चचे पास्टर डॉमिनिक डिसोझा यांना उत्तर गोव्यातून तडीपार करा तसेच गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली होती.

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी केदार नाईक यांना याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले होते. या प्रकारांची पार्श्वभूमी लक्षात घेतलास समजू शकेल कि, फोंडा येथील एका हिंदू धर्मीय व्यक्तीला जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रकार केला होता. त्यामुळेच त्यांना उत्तर गोव्यातून 'तडीपार' करावे अशी मागणी करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com