Stray Dogs: फोंड्यात भटक्या कुत्र्यांची दहशत! हल्‍ल्‍यांचे प्रकार वाढले, त्वरित बंदोबस्ताची मागणी

Ponda Stray Dogs: फोंडा शहर तसेच लगतच्या भागात भटक्या बेवारस कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून रात्रीच्यावेळेला हे कुत्रे रस्त्यावरून चालत जाणाऱ्यांच्या तसेच दुचाकीस्वारांच्या मागे लागत असल्याने अपघातांचे सत्रच सुरू आहे.
stray dogs
stray dogs Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Stray Dogs Problems

फोंडा: फोंडा शहर तसेच लगतच्या भागात भटक्या बेवारस कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून रात्रीच्यावेळेला हे कुत्रे रस्त्यावरून चालत जाणाऱ्यांच्या तसेच दुचाकीस्वारांच्या मागे लागत असल्याने अपघातांचे सत्रच सुरू आहे. या बेवारस कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी रात्रीच्यावेळी कुत्रे मागे लागण्याच्या प्रकारामुळे दुचाकीस्वार जोरात वाहन दामटतात, त्यामुळे अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळेला वाटसरू चालत रस्त्यावरून जात असल्यास हे कुत्रे मागे लागतात आणि चावे घेतात, त्यामुळे लोकांत भीती पसरली आहे. रात्रीच्यावेळेला तर हे कुत्रे झुंडीने फिरत असून अपरात्री जोरदार भुंकणे तसेच आपसांत भांडण करण्याच्या प्रकारामुळे शांतता भंग होत आहे.

या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम जोरात राबवण्याची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. मागच्या काळात फोंडा भागात लहान मुलांना कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार झाले होते. आताही तोच धोका असून विशेषतः शाळकरी मुलांच्या मागे हे कुत्रे लागत असल्याने या मुलांत घबराट पसरली आहे.

stray dogs
Stray Dogs: 50 रुपयांत लोकं कुत्रे पकडतील असं तुम्हाला वाटतं का? निर्बिजीकरणाबाबत गोवा सरकार गंभीर नाही; LOP आलेमाव

श्‍वानप्रेमींना पुळका...

फोंडा शहरात अनेक ठिकाणी श्‍वानप्रेमी या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असल्याने या कुत्र्यांचे फावले आहे. बऱ्याच ठिकाणी हे श्‍वानप्रेमी शिजवलेले अन्न आणून या कुत्र्यांसमोर टाकतात. कुत्र्यांच्या या बडदास्तीमुळे ते इतर लोकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे श्‍वानप्रेमींनी विचार करून या कुत्र्यांना अन्न घालावे, अशी मागणी केली जात आहे.

stray dogs
Goa Tourism: गोव्यात किनारे, हॉटेल्स हाऊसफुल्ल! पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता

महिन्याला साठ ते सत्तरजणांना चावे!

फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळातील नोंदीनुसार महिन्याला किमान साठ ते सत्तरजणांना कुत्र्यांकडून चावे घेण्याच्या प्रकारांची नोंद करण्यात येत आहे. इतर खासगी इस्पितळात उपचार घेणाऱ्यांची संख्याही जास्त असेल. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com