Ponda STP : कुर्टीत भर लोकवस्तीत ‘एसटीपी’ प्रकल्प!

स्थानिकांचा तीव्र विरोध : आधी सांगितले पंप हाऊस, आता म्हणतात प्रक्रिया प्रकल्प
Ponda STP Project
Ponda STP ProjectDainik gomantak
Published on
Updated on

फोंडा : कुर्टी-खांडेपार पंचायतक्षेत्रातील नवीन हाऊसिंग बोर्ड कॉलनीच्या बाजूलाच मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न संबंधित महामंडळाकडून सुरू झाले आहे. भर लोकवस्तीत हा एसटीपीचा प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. एसटीपी प्रकल्प लोकवस्तीत नको, दुसरीकडे वळवा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

फोंड्यात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर कुर्टी हाऊसिंग बोर्ड कॉलनीत प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे ठरले होते. मात्र, त्यावेळेला स्थानिकांनी तीव्र विरोध करून हा प्रकल्प भर लोकवस्तीत नको, तो अन्यत्र हलवा अशी मागणी केली होती. स्थानिक कुर्टी-खांडेपार पंचायतीनेही पूर्ण सहकार्य केले होते. त्यामुळे हे काम नंतरच्या काळात बंदच पडले होते. फक्त या प्रकल्पाच्या वाहिन्या टाकण्याचे काम तेवढे सुरू होते.

Ponda STP Project
Ponda STP: स्वच्छ सुंदर फोंड्यासाठी ‘एसटीपी...!’

मात्र, २७ मार्चला मलनिस्सारण प्रकल्प महामंडळाने कुर्टी-खांडेपार पंचायतीला एक पत्र पाठवून नवीन हाऊसिंग बोर्ड कॉलनीत मोकळ्या जागी आठ एमएलडीचा एसटीपी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे कळवल्यानंतर खळबळ माजली. हा प्रकल्प इतरत्र हलवावा, अशी मागणी न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सावंत, कुर्टीचे माजी सरपंच शैलेश शेट आदींनी केली आहे.

प्रकल्पामुळे स्थानिकांना अडचण

कुर्टीतील न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनीत एसटीपी प्रक्रिया प्रकल्प नव्हे तर पंप हाऊस बांधण्यात येत असल्याचे नागरिकांना संबंधित महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण आता प्रत्यक्षात प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. एसटीपी प्रक्रिया प्रकल्पामुळे स्थानिकांना तीव्र स्वरुपाच्या समस्या निर्माण होणार असल्याने हा विरोध दर्शवण्यात आला आहे.

Ponda STP Project
Ponda Municipality Election 2023: प्रभाग 4 खुला झाल्याने चुरस वाढणार

विद्यार्थ्यांनाही धोका

या नियोजित एसटीपी प्रकल्पाशेजारीच विद्यालय असून येथे पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाशेजारी हा एसटीपी प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास त्याचा त्रास या विद्यार्थ्यांना होऊ शकतो, असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधितांनी हा प्रकल्प ज्या ठिकाणी वस्ती नाही, अशा ठिकाणी न्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Ponda STP Project
Ponda News : उपआरोग्य केंद्राचे स्थलांतर करा

काम लवकर सुरू होणार

स्थानिकांनी बैठका घेऊन प्रकल्पाला विरोधही केला आणि तसे पंचायतीलाही कळवले आहे. तरीपण महामंडळाकडून प्रकल्प उभारण्याचा अट्टाहास सुरू असून जागाही स्वच्छ केली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात हे काम सुरू होईल, असा अंदाज असून नागरिकांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com