Ponda : प्रभाग 8 अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत

कोविडमुळे रखडली कामे : आस्थापने, संकुलांनी व्यापलेला भाग; तिरंगी लढतीची शक्‍यता
polluted water
polluted waterDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda : फोंडा-पणजी हमरस्त्याबरोबरच अंतर्गत भागाचाही समावेश असलेला प्रभाग म्हणजे आठ. या प्रभागात आस्थापनांबरोबरच संकुलाचेही जाळे दिसून येते. शिवाय वारखंडच्या बहुतेक भागाचा समावेश यात आहे. या प्रभागाचा विकास कोविड काळात कामे रखडल्याने थंडावल्याचा दावा नगरसेवक प्रदीप नाईक यांनी केला. परिणामी प्रभागाला विकासाची प्रतीक्षा आहे. यावेळी हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने प्रदीप नाईक यांनी त्यांची मुलगी प्रतीक्षा नाईक हिला निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या प्रभागात तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

फोंडा बाजारातून जर पणजीला हमरस्ता टाळून शॉर्टकटने जायचे असेल तर वारखंडेतून जावे लागते. आणि इथूनच प्रभाग क्रमांक आठची हद्द सुरू होते. वारखंडे येथील साकवापासून सुरू झालेला प्रभाग क्रमांक 8 नंतर सावईकर इस्पितळ करत करत थेट हमरस्त्याला भिडतो. तर डाव्या बाजूला वळत तो थेट हनुमान मंदिरापर्यंत पोहोचतो. हे मंदिर म्हणजे फोंडा नगरपालिकेची सीमा. इथे पालिकेची कक्षा संपते.

polluted water
Ponda-Sanquelim Muncipality Election 2023: साखळी, फोंडा नगरपालिकांसाठी 118 उमेदवारी अर्ज, आज छाननी
Muktidham cremation ground
Muktidham cremation groundDainik Gomantak

तसे पाहता या प्रभागाचे विभाजन दोन भागात झाले आहे. एका बाजूला हमरस्ता तर दुसऱ्या बाजूला आल्मेदा शाळेच्या विरुद्ध बाजूचा भाग, जो वळणे घेत घेत मारुती मंदिरानजीकच्या हमरस्त्याला मिळतो. या प्रभागाचा विकास साधणे म्हणजे एक आव्हानच आहे. नगरसेवक प्रदीप नाईक हे आतापर्यंत या प्रभागातून दोनवेळा निवडून आलेले आहेत.

‘मुक्तिधाम’च्या नूतनीकरणाचे काम सुरू : नाईक

गेल्या पाच वर्षांत प्रभागात अनेक ठिकाणी गटारांचे बांधकाम, पदपथ, सावईकरांच्या घराजवळचा रस्ता, पेव्हर्स घालणे, हेरिटेज इमारतीत बॅडमिंटन खेळण्याची सोय अशी अनेक कामे आपण पूर्ण केल्याचे नगरसेवक प्रदीप नाईक यांनी सांगितले. काही कामे निविदा जारी होऊनही सुरू झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या कित्येक वर्षांत सुरू न झालेल्‍या ‘मुक्तिधाम’ या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम आपल्याच कारकिर्दीत सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले. कोविडची दोन वर्षे वगळता विकासाची गती अपेक्षेप्रमाणे राहिली, असे ते म्हणाले.

polluted water
Ponda-Sanquelim Muncipality Election 2023: साखळी नराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; दोन्ही नगरपालिकांसाठी 188 उमेदवारी अर्ज

बहुतांश कामे रखडल्याने विकासाचे आव्हान

प्रदीप नाईक 2008 साली प्रथम नगरसेवक बनले. या पाच वर्षाच्या कारकिर्दीत ते नगराध्यक्षही बनले. गेल्या खेपेला त्यांनी मगोप्रणीत ‘रायझिंग फोंडा’ पॅनेलतर्फे निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी 214 मतांची आघाडी घेऊन विजय प्राप्त केला. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांबद्दल विचारल्यावर त्यांनी यादीच दिली. पण त्याचबरोबर कोविडमुळे दोन वर्षे वाया गेल्याची खंतही व्यक्त केली.

या प्रभागाचा फेरफटका मारल्यास हनुमान देवस्थानचा नीटनेटकेपणा लक्षात भरतो. सुरूवातीला असलेल्या साकवाची अवस्था मात्र मनाला खटकते. काही ठिकाणी बसवलेले पेव्हर्स, रस्ते, पदपथही नजरेत भरतात. काही ठिकाणी निविदा निघूनही कामे सुरू झाली नसल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com