Ponda News : रस्त्यावर पडलेल्या फांदीवरील आंबे पळविण्यासाठी झाली गर्दी

Ponda News : सुदैवाने कुणीही जखमी झाला नाही, मात्र या फांदीला लागलेले पिकलेले व कच्चे आंबे पळविण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.
Ponda
PondaDainik Gomantak

Ponda News :

फोंडा, येथील वरचा बाजारातील तिठ्यावरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी अचानक आंब्याच्या झाडाची भली मोठी फांदी अचानक कोसळली आणि पळापळ झाली.

सुदैवाने कुणीही जखमी झाला नाही, मात्र या फांदीला लागलेले पिकलेले व कच्चे आंबे पळविण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.

या रस्त्यावरील तिठ्यावर अनेक प्रवासी उभे असतात. बहुतांश बसगाड्याही याच ठिकाणी थांबतात. वाहतूक पोलिसही याच ठिकाणी उभे राहून वाहतूक हाताळतात. मात्र ही घटना घडली त्यावेळेला एकही प्रवासी नव्हता, मात्र जवळच काही लोक व वाहतूक पोलिस उभे होते.

Ponda
Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

आंब्याची भली मोठी फांदी कोसळताना मोठा आवाज झाल्याने हे लोक दूर पळाले, त्यामुळे अनर्थ घडला नाही. भर रस्त्यावरच ही फांदी पडल्याने वाहतूक खोळंबली, मागाहून फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन रस्त्यावरील ही भली मोठी फांदी बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com