Ponda Municipality: फोंड्यात बेकायदा दुचाकी विक्री करणाऱ्या आस्थापनाला सील; पालिकेची कारवाई

Ponda Municipality: येथील राजीव गांधी कलामंदिरसमोरील एका बेकायदा आस्थापनाला पालिकेने मंगळवारी सील ठोकले.
Ponda Municipality take action as the establishment set up to sell two wheelers don't have a commercial license
Ponda Municipality take action as the establishment set up to sell two wheelers don't have a commercial license Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Municipality: येथील राजीव गांधी कलामंदिरसमोरील एका बेकायदा आस्थापनाला पालिकेने मंगळवारी सील ठोकले. दुचाकी विक्री करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या आस्थापनाकडे कोणताही व्यावसायिक परवाना नसल्याने पालिकेने ही कारवाई केली. परवाने नसताना एवढे मोठे पक्के बांधकाम कसे काय करण्यात आले, याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

फोंडा बेतोडा रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या या दुचाकी विक्री आस्थापनाला कोणताच परवाना नसल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गेल्या २०२२ मध्ये फोंडा पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या आस्थापनाला तात्पुरती शेड उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली, मात्र पक्के बांधकाम करण्यात आल्याने तक्रारदाराने पुन्हा एकदा आपल्या तक्रारीचा पाठपुरावा पालिकेकडे केल्यानंतर याप्रकरणी फोंडा पालिकेने सील करण्याचा निर्णय घेतला.

Ponda Municipality take action as the establishment set up to sell two wheelers don't have a commercial license
Ponda Municipal Council: फोंडा नगराध्यक्षपदी रितेश तर उपनगराध्यक्षपदी दीपा कोलवेकर यांची निवड

फोंडा पालिकेने या बेकायदा आस्थापनाविरुद्धच्या तक्रारीला अनुसरून संबंधित मालकाला कायदेशीर कागदपत्रे आणून देण्याची सूचना करण्यात आली होती, पण तशी कोणतीच कागदपत्रे पालिकेकडे न आल्याने शेवटी पालिकेने कारवाई केली. फोंडा पालिकेचे अभियंत्यांनी आम्ही कायदेशीर कागदपत्रे सुपूर्द होईपर्यंत वाट पाहिली व नंतर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी सील करण्याचा आदेश काढला, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com