Ponda Municipal Council: फोंड्यात राहणं महागणार? नगरपालिकेसमोर आर्थिक आव्हानांचा डोंगर; स्थानिकांना घर कर वाढीचा फटका बसण्याची शक्यता

House Tax Hike Ponda: फोंडा नगरपालिका सध्या आर्थिक वाढीसाठी घर कर वाढवण्याचा विचार करत आहे
Ponda Goa News
Ponda Goa NewsDainik Gomanta
Published on
Updated on

फोंडा: फोंडा नगरपालिका सध्या वाढत्या खर्चाशी झुंजत आहे. वाढत्या खर्चामुळे फोंडा नगरपालिकेसमोर आर्थिक आव्हान आहे, मुख्यत्वेकरून मासिक वेतन बिल ४० लाख रुपये असल्याने फोंडा नगरपालिका सध्या आर्थिक वाढीसाठी घर कर वाढवण्याचा विचार करत आहे. वाढत्या प्रशासकीय खर्चाचा समतोल साधण्यासाठी आणि महसूल गोळा करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे अध्यक्ष आनंद नाईक सांगतात.

सध्या फोंडा रहिवासी प्रति चौरस मीटर ७ रुपये प्रमाणे घरचा कर देतात. महत्वाचं म्हणजे वर्ष २०१९ पासून यामध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. यावर बोलताना नाईक म्हणालेत की बाकी नगरपालिका आणि काही ग्रामपंचायतींच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे.

Ponda Goa News
Ponda: फोंड्यात बदलणार राजकीय समीकरणे? विधानसभेसाठी भाजप-मगो युतीचे संकेत; रवींच्या रणनीतीकडे लक्ष

फोंडा नगरपालिकेने यापूर्वी वर्ष २०२२मध्ये कर वाढ करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये घर कर १५ रुपये प्रति चौरस मीटर आणि व्यावसायिक कर २० ते १०० रुपये प्रति चौरस मीटर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र स्थानिकांनी याला विरोध दर्शविल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.

"घर कर दर चार वर्षांनी सुधारित करणे आवश्यक आहे," नाईक यांनी स्पष्ट केले आणि पुढील बैठकीत प्रस्तावित दरवाढीबाबत निर्णय घेईल असे त्यांनी सूचित केले आहे. शिवाय फोंडा नगरपालिका सध्या दोन महिन्यांत आधीच २ कोटी रुपये गोळा करून, थकबाकी भाडे वसूल करण्यावर भर देत आहे. कचरा व्यवस्थापनाच्या वाढत्या खर्चालाही नगरपालिकेला सामोरे जावे लागत आहे, आणि यासाठी नगरपालिका कचरा संकलन सेवेसाठी प्रत्येक घरातून ७० रुपये वसूल करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com