Kanhaiya Kumar Death Case : सीसीटीव्ही फुटेजमध्ये अडकला खुनाचा तपास; फॉरेन्सिक पथकाचा घेणार आधार

Ponda Death Case : २० जून ते ११ जुलैपर्यंत फोंडा पोलिस स्‍थानकातील सीसीटीव्‍ही चालत नव्‍हते अशी भूमिका फोंडा पोलिसांनी घेतली आहे.
CCTV
CCTVDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव, कन्‍हैय्‍याकुमार मोंडल मृत्‍यू प्रकरणाची चौकशी फोंडा पोलिसांकडून अजून सीसीटीव्‍ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळत नसल्‍याने काही प्रमाणात अडली आहे. या पार्श्वभूमीवर हे फुटेज गायब कसे झाले याची खात्‍यांतर्गत चौकशी सुरू करण्‍यात आली आहे.

२० जून ते ११ जुलैपर्यंत फोंडा पोलिस स्‍थानकातील सीसीटीव्‍ही चालत नव्‍हते अशी भूमिका फोंडा पोलिसांनी घेतली आहे. मात्र, अशा त्रुटी राहिल्‍यास त्‍याची पोलिस डायरीत नोंद करण्‍याची गरज असते, परंतु फोंडा पोलिसांच्‍या पोलिस डायरीत अशी कोणतीही नोंद नसल्‍याचे उघड झाले आहे.

२४ जून रोजी रात्री कन्‍हैय्‍याकुमार याला फोंडा पाेलिसांनी ताब्‍यात घेतले हाेते आणि नंतर त्‍याला फोंडा पाेलिस स्‍थानकात आणले हाेते. त्‍यानंतर त्‍याला रात्री लोटली येथील मिसींग लिंक रोडवर सोडून देण्‍यात आले होते. दुसऱ्या दिवशी कन्‍हैय्‍याकुमार मृतावस्‍थेत सापडला होता.

या प्रकरणात काल ट्रकचालक वासुदेव मदार (वय ५९) याला अटक केल्यानंतर त्‍या रात्री आपण रस्त्यावर कुठलेही वाहन नसल्‍याने भरधाव ट्रक चालवित होतो. लोटली येथे आपली गाडी कुठल्‍यातरी वस्‍तूवरून गेली असे आपल्‍याला वाटले. मात्र, रस्‍त्‍यात काळोख होता आणि कुणीही दिसत नसल्‍यामुळे आपण ट्रक घेऊन पुढे गेलो. या दरम्‍यान आपण ट्रकमधून खाली उतरलोही नाही अशी कबुली या ट्रकचालकाने दिली आहे.

फुटेजप्रकरणी कसून चौकशी’

दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना, हे फुटेज कसे गायब झाले आणि जर कुणी ते मुद्दाम गायब केले असतील, तर त्‍याची कसून चौकशी केली जाईल व ही चौकशी सुरू झाल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. हे फुटेज मिळण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्‍न करत आहोत. यासाठी गरज पडली तर फॉरेन्सिक तज्‍ज्ञांचाही आधार घेतला जाईल, असे त्‍यांनी सांगितले.

CCTV
PM Modi France Visit: फ्रान्सच्या एलिसी पॅलेसमध्ये अचानक वाजल 'हे' बॉलिवुडचे गाणं अन् पीएम मोदी पाहतचं राहिले, Watch Video

खरा गुन्हेगार शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

ट्रकचालकाच्‍या कबुलीप्रमाणे, त्‍याचा ट्रक कन्‍हैय्‍याकुमारच्‍या अंगावरून गेला असला तरी त्‍याच्‍यावर तीक्ष्‍ण हत्‍याराने वार झाले त्‍यात त्‍याचा कुठलाही हात नसल्‍याचे उघड झाले आहे. त्‍यामुळे त्‍याचा अपघातात जरी सहभाग असला तरी खुनात नाही ही माहिती पुढे आल्‍याने आता खरा खुनी कोण हे शोधून काढण्‍याचे आव्‍हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

कन्‍हैय्‍याकुमार याचा मृत्यू अपघाती नसून त्याचा खून झाल्याचे मायणा-कुडतरी पोलिसांनी शोधून चांगली कामगिरी बजावली आहे. पूर्वीचे पोलिस अधिकारी महत्त्वाच्‍या प्रकरणात मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणीवेळी स्‍वत: हजर रहायचे.

आताच्‍या नवीन पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्‍याला ही सवय लावून घेण्‍याची गरज आहे. वैद्यकीय तपासणीवेळी जर तपास अधिकारी तेथे स्‍वत: उपस्‍थित राहिल्‍यास त्‍यांना अनेक गोष्‍टींचा उलगडा होऊ शकतो.

- डॉ. मधू घोडकिरेकर, शवचिकित्‍सक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com