Ponda: गोवा मुक्तिदिनानिमित्त नागझर कुर्टीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ponda: रक्तदान करण्यासाठी विशेषतः महिलावर्ग पुढे सरसावत आहे.
Ponda | Blood Donation
Ponda | Blood DonationDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे भाग्य रक्तदात्याला मिळते याहून चांगली दुसरी गोष्ट नाही. रक्तदान करण्यासाठी आता विशेषतः महिलावर्ग पुढे सरसावत आहे ही जमेची बाब असून रक्तदानाविषयीचे गैरसमज दूर होण्याची आवश्‍यकता आहे, असे उद्‍गार कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी यांनी काढले.

नागझर-कुर्टी येथील सरकारी शाळेच्या वास्तूत गोवा मुक्तिदिनानिमित्त काल नक्टेश्‍वर राम युवा मंडळातर्फे सार्थक फाऊंडेशनच्या सहकार्याने व मणिपाल इस्पितळाच्या सहयोगाने रक्तदान शिबिर आयोजिले होते. यावेळी रक्तदाब तसेच मधुमेह तपासणीही करण्यात आली.

Ponda | Blood Donation
Ponda: फोंड्यात केबलच्या तुटक प्रक्षेपणाला लोक वैतागले; तक्रारी देऊनही 'येरे माझ्या मागल्या'

या कार्यक्रमाला मगो पक्षाचे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर, एफआयबीडीओचे विश्‍वरूप बिस्वास, सार्थक फाऊंडेशनचे सुदेश नार्वेकर, सरपंच नावेद तहसीलदार, स्थानिक पंचसदस्य बाबू च्यारी, परवीन बानू, तसेच नक्टेश्‍वर राम युवा मंडळाचे आकाश नाईक, भोजराज नाईक, अनुप मामलेकर, सुदन नाईक, सोहम नाईक, दीप नाईक व इतर सदस्य उपस्थित होते.

प्रिया च्यारी यांनी सांगितले की, रक्तदानासाठी युवा पिढीने पुढे येण्याची आज गरज आहे. आपत्कालीन वेळेत रक्ताची गरज रुग्णाला निर्माण होते, अशा वेळेला पुरेसा रक्तसाठा असणे गरजेचे असून त्यादृष्टीने प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. युवा पिढीचे कौतुक करताना प्रिया च्यारी यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल मंडळ तसेच सार्थक फाऊंडेशन व इतरांचे आभार मानले.

सार्थक फाऊंडेशनचे सुदेश नार्वेकर यांनी आपल्या संघटनेकडून आतापर्यंत अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली, त्याला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असे सांगितले. कुर्टी-नागझरीतील या शिबिराला युवा व महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला असे सांगून अशाप्रकारच्या उपक्रमात सातत्याने सहभाग हा महत्त्वाचा असतो, असे नमूद केले. बाबू च्यारी यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com