Ponda News : पर्यावरणासाठी प्रत्येकाने झाड लावावे! जयंत मिरिंगकर

Ponda News : बेतोडा बोरी बगलमार्ग परिसरात वनमहोत्सव उत्साहात
Ponda
Ponda Dainik Gomantak

Ponda News :

फोंडा, पर्यावरण राखायचे असल्यास झाडे लावल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने झाड लावावे, असे उद्योजक जयंत मिरिंगकर यांनी सांगितले.

फोंड्यातील बेतोडा-बोरी बगल मार्गावर आज (बुधवारी) जागतिक पर्यावरणदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली. फोंड्यातील सार्थक या संस्थेतर्फे या वनमहोत्सवासाठी पुढाकार घेतला.

Ponda
Goa News: गोवा काँग्रेसचा 2027 साठी 'अबकी बार 30 पार'चा नारा, निरंकाल-दाभाळ येथे आढळली मगर; ठळक घडामोडी

या वनमहोत्सवात वन खाते उत्तर गोवा, रोटरी क्लब मडगाव मिडटाऊन, जेसीआय फोंडा, जेसीआय मडगाव, जीव्हीएम महाविद्यालय, एमईएफ फातिमा हायस्कूल, विद्या वृद्धी स्कूल, पर्यावरणासाठी काम करणारी हिलदारी संस्था तसेच फोंडा पत्रकारांतर्फे या वनमहोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्या वृद्धी तसेच फातिमा स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही झाडे लावली.

सार्थक फाउंडेशनचे सुदेश नार्वेकर, वन खात्याचे अधिकारी दीपक तांडेल, रमाकांत, दक्षता लांबोर, अर्जुन गावस, दिनेश तारी आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com