Goa Chess Tournament : देवेश नाईक सलग नऊ विजयांसह अजिंक्य

मंदार लाड उपविजेता, आयुष शिरोडकर तिसरा
Devesh naik
Devesh naikDainik Gomantak
Published on
Updated on

Chess Tournament : फोंड्याच्या देवेश नाईक याने ओळीने नऊ डाव जिंकून राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. रविवारी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी द्वितीय मानांकित खेळाडूने विजयी धडाका राखत वर्चस्व अबाधित राखले.

देवेशने सर्वाधिक नऊ गुण झाले. आठव्या फेरीत त्याने सरस पोवार याला, तर नवव्या फेरीत चैतन्य गावकर याला हरविले. शनिवारी देवेशविरुद्ध पराभूत झालेला अव्वल मानांकित मंदार लाड याला आठ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

रविवारी त्याने अनुक्रमे राजवीर पाटील व शुभ बोरकर यांच्यावर मात केली. आयुष शिरोडकर याला साडेसहा गुणांसह तिसरा क्रमांक मिळाला.

Devesh naik
Calangute Accident : कळंगुटमधील भीषण अपघातात 18 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेली स्पर्धा मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिर सभागृहात झाली. चैतन्य गावकर, ऋषिकेश परब, अनीश नाईक, सरस पोवार, जोशुआ तेलिस, शुभ बोरकर, राजवीर पाटील, जी. माधवन, अनिकेत एक्का, जेनिसा सिक्वेरा, सिम्प्लिसियो व्हिएगस व आदर्श पाटेकर यांना अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक मिळाला.

७ ते १५ वर्षांखालील वयोगटात अनुक्रमे प्रयांक गावकर, आरव प्रभू, शनाया देसाई, आर्यव्रत नाईक देसाई, शौर्य अग्रासनी, स्कायला रॉड्रिग्ज, अवनी सावईकर, विपुल कदम, अथर्व शिरोडकर, दिया सावळ, विधी नाईक, साहिल शेट्टी, कनिष्क सावंत, साहिल नाईक, भुवनराज सरदेसाई, आर्या दुबळे यांना बक्षीस मिळाले.

सर्वांत युवा स्पर्धक इव्हान तेलिस, उत्कृष्ट महिला सानिया नाडकर्णी, डॉ. प्रज्ञा काकोडकर (४० वर्षांवरील), नितीनचंद्र दिघे (६० वर्षांवरील) यांनाही बक्षीस प्राप्त झाले.

Devesh naik
Goa Gram Sabha : राज्यातील ग्रामसभा तापल्‍या; अवेडे येथे उपसरपंचाच्या पतीला मारहाण

गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, स्पर्धेचे पुरस्कर्ते अल्लाबक्ष मुल्ला, राज्य संघटनेचे सचिव आशेष केणी, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव दत्ताराम पिंगे, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, नारायण पेडणेकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

चौघेजण राष्ट्रीय स्पर्धेस पात्र

राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणी फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे पहिले चार क्रमांक पटकावलेले देवेश नाईक, मंदार लाड, आयुष शिरोडकर व चैतन्य गावकर आगामी राष्ट्रीय सीनियर बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा पुणे येथे १५ ऑगस्टपासून खेळली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com