Ponda News : फोंड्यात शोभायात्रेसाठी लाखोंची बक्षीसे; पालिकेकडून सुरवात

Ponda News : मंगळवारी दुपारी महालसा देवीला नमन
Ponda
PondaDainik Gomantak

Ponda News :

फोंडा, येथील राज्यस्तरीय शिमगोत्सवाला येत्या मंगळवारी २६ तारखेपासून सुरवात होत आहे. म्हार्दोळ येथील महालसा देवीला दुपारी साडेतीन वाजता नमन घालण्यात येणार आहे.

त्यानंतर पालिकेकडून शोभायात्रेला सुरवात होणार असल्याचे मुख्याधिकारी योगिराज गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने या शिमगोत्सवात राजकीय नेते व्यासपीठावरील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी नसतील. वेळेचे बंधन असल्याने तिस्क येथून नव्हे तर पालिकेकडून शोभायात्रेला सुरवात होणार आहे.

Ponda
Goa Cricket Association: सागर उदेशीच्या फिरकीचा विळखा; चौगुले क्लबचा दुसरा डाव 94 धावांत संपुष्टात

पर्यटन खात्यातर्फे होणाऱ्या या शिमगोत्सव शोभायात्रेसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन समिती निवडण्यात आली आहे. यावेळी समितीचे विशांत नाईक, रेखा शिरोडकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक रोहिदास भोमकर व सत्यवान गावकर आदी उपस्थित होते.

१० लाख ५७ हजर ५०० रुपयांची बक्षीसे

आचारसंहितेमुळे रात्री दहापर्यंतच शोभायात्रेला परवानगी असल्याने ही शोभायात्रा फोंडा पालिका इमारतीकडून सुरू होणार असून फोंडा बसस्थानकावर सांगता होईल.

शोभायात्रेत सहभागी होणारे चित्ररथ, रोमटामेळ तसेच लोकनृत्य पथकांसाठी तसेच दोन गटात वेशभूषा स्पर्धा होणार आहे. विविध स्पर्धांसाठी एकूण १० लाख ५७ हजर पाचशे रुपयांची बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com