Mayor Ritesh Naik : स्वच्छ फोंड्यासाठी सहकार्य करा : नगराध्यक्ष रितेश नाईक

Ponda News : काझीवाडा - कुरतरकरनगरी प्रभाग क्रमांक नऊमधील नूतनीकरण केलेल्या उद्यानाचे उद्‍घाटन आज नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच या प्रभागाचे नगरसेवक रूपक देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
ponda
ponda Dainik Gomantak
Published on
Updated on

शहर स्वच्छ सुंदर आणि नितळ ठेवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू असून पालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी केले.

काझीवाडा - कुरतरकरनगरी प्रभाग क्रमांक नऊमधील नूतनीकरण केलेल्या उद्यानाचे उद्‍घाटन आज नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच या प्रभागाचे नगरसेवक रूपक देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी फोंडा पालिकेचे नगरसेवक आनंद नाईक, पालिका मुख्याधिकारी योगिराज गोसावी, पालिका अभियंता विशांत नाईक उपस्थित होते.

ponda
Dengue Cases In Goa: डासांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्मक उपाय; गोवा आरोग्‍य खाते सक्रिय

रितेश नाईक म्हणाले की, पालिकेतर्फे खूप चांगल्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत आणि होत आहेत. त्यातील एक महत्त्वाची म्हणजे शहर परिसरातील भटक्या गुरांचा बंदोबस्त पालिकेतर्फे करण्यात येत आहे. फोंडा शहर परिसरात भटक्या गुरांच्या उच्छादामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी बेतोडा येथे गोशाळा बांधण्यात आली असून दोन दिवसांत या गोशाळेचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.

या भटक्या गुरांची रवानगी या गोशाळेत करण्याबरोबरच त्यांची देखभाल करण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी पालिकेच्या चांगल्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य दिले आहे, आणि भविष्यातही अशा सहकार्याची गरज असल्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले.

नगरसेवक रूपक देसाई म्हणाले की, आपण पालिकेच्या निवडणुकीला उभा राहिलो असता, या प्रभागातील मतदारांना भेटण्यासाठी आलो त्यावेळी येथील उद्यानाची माहिती त्यांनी दिली.

त्याच क्षणी हे उद्यान नूतनीकरण करून त्याचा लाभ मुलांबरोबर ज्येष्ठ नागरिकांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचा निश्‍चय मनात केला आणि आता तो पूर्णत्वास आणला. याकामी कृषिमंत्री रवी नाईक आणि नगराध्यक्ष रितेश नाईक यांचे तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले. या उद्यानाचा योग्य वापर नागरिकांनी करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com