Ponda Charitable Trusts : गरजू कुटुंबांना मदतीचा हात द्या!

आशिष शिरोडकर : फोंड्यात गावस ट्रस्टकडून नेत्रहिनांच्या कुटुंबांना मदत
Help for blind families from Gavas Trust in Ponda
Help for blind families from Gavas Trust in PondaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे आवश्‍यक असून अशा उपक्रमात वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्टने सहभाग घेतल्याने ही आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांना पोलिसांचेही नेहमीच सहकार्य लाभेल, अशी ग्वाही फोंडा पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी दिली.

फोंडा पोलिस स्थानकात बुधवारी वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे फोंड्यातील नेत्रहीन सदस्य असलेल्या दहा कुटुंबांना प्रत्येक महिन्याला धान्य देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर तसेच पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर, नेहा गावस, शैलेश गावस यांच्या हस्ते झाला.

Help for blind families from Gavas Trust in Ponda
Ponda Municipality Election 2023: प्रभाग 4 खुला झाल्याने चुरस वाढणार

यावेळी शिरोडकर म्हणाले की, पोलिस नेहमीच गुन्हेगारी रोखण्यासाठी कटिबद्ध असतात; पण सामाजिक बांधिलकी जपण्याचे उपक्रमही पोलिस राबवतात. चॅरिटेबल ट्रस्टना आवश्‍यक सहकार्यही दिले जाते, त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांतून विविध ट्रस्टनी सेवाभाव जपावा, असे सांगत त्यांनी ट्रस्टच्या उपक्रमांचे कौतुक केले.

Help for blind families from Gavas Trust in Ponda
Ponda STP : कुर्टीत भर लोकवस्तीत ‘एसटीपी’ प्रकल्प!

पोलिसांनी पुरवली उपयुक्त माहिती

यावेळी नेहा गावस म्हणाल्या, वासंती गावस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून नेत्रहीन सदस्यांच्या कुटुंबीयांना मदत पुरवण्याचे ठरवले. त्यानुसार फोंडा पोलिसांशी संपर्क साधून अशा कुटुंबांची माहिती मागवली. पोलिसांनी ती पुरवली असल्याने हा उपक्रम राबवणे शक्य झाले. याबद्दल नेहा गावस यांनी फोंडा पोलिसांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com