Ponda By Election: फोंड्यात घोषणाबाजीने तणाव! भाजप-काँग्रेस आमनेसामने; पोटनिवडणुकीसाठी तिन्ही पक्षांतर्फे अर्ज दाखल

BJP Congress Clash in Ponda: भाजपचे उमेदवार रितेश नाईक, काँग्रेसचे केतन भाटीकर तर आपच्या गितेश नाईक अशा तिघांनी आपापली उमेदवारी दाखल केली.
BJP vs Congress Goa
BJP congress clash in pondaDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Election Updates : फोंडा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी दाखल केली, मात्र भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली, पण पोलिसांनी नियंत्रण ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

भाजपचे उमेदवार रितेश नाईक, काँग्रेसचे केतन भाटीकर तर आपच्या गितेश नाईक अशा तिघांनी आपापली उमेदवारी दाखल केली. भाजपचे उमेदवार रितेश रवी नाईक यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार गोविंद गावडे, मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर तसेच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या केतन भाटीकर समवेत गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार युरी आलेमाव इतर आमदार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. आपचे उमेदवार गितेश नाईकसोबत प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार क्रूझ सिल्वा, वेन्झी व्हिएगस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या फोंड्यात भाजप, काँग्रेस आणि आपचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार आहे.

BJP vs Congress Goa
Goa Politics: खरी कुजबुज; ...तर सुदिन, ‘मगो’बाबत वेगळा निर्णय

परस्परविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

फोंड्यातील प्रशासकीय इमारतीत उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेल्या भाजप व काँग्रेस उमेदवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते आमनेसामने आल्याने त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आणि काँग्रेस विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

BJP vs Congress Goa
रवी नाईकांचा वारसा की केतन भाटीकरांचे जनबळ? फोंड्यात वर्चस्वाची लढाई - संपादकीय

जोरजोरात एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना इमारत संकुलाच्या बाहेर पिटाळल्याने तणाव निवळला मात्र काँग्रेस नेत्यांनी पोलिसांनी फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संकुलाबाहेर काढले पण भाजप कार्यकर्त्यांना मुभा दिल्याचा आरोप केला तर भाजपच्या नेत्यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी संकुलाबाहेर काढले असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com