फोंड्यात कोण ठरला असता 'सिकंदर'? अजूनही सगळीकडे चर्वितचर्वण; आता 'मिशन 2027'

Ponda By Election Cancle: ‘शिमगा संपला तरी कवित्व उरते’ या उक्तीप्रमाणे फोंड्याची पोटनिवडणूक रद्द झाली तरी या निवडणुकीबाबतचे चर्वितचर्वण काही संपलेले दिसत नाही.
Ponda By Election
Ponda By ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: ‘शिमगा संपला तरी कवित्व उरते’ या उक्तीप्रमाणे फोंड्याची पोटनिवडणूक रद्द झाली तरी या निवडणुकीबाबतचे चर्वितचर्वण काही संपलेले दिसत नाही. अजूनही फोंडावासीय या निवडणुकीच्या ‘हँगओव्हर’खाली दिसत आहेत. कोण जिंकणार, यावर त्यावेळी पैजा लावल्या जात होत्या आणि आताही यावर ठिकठिकाणी चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.

खरे तर ही निवडणूक सर्वचदृष्ट्या ऐतिहासिक ठरली आहे. केवळ सात-आठ महिन्यांकरिता असूनही या निवडणुकीकरता भाजप व काँग्रेस या दोन्हीही पक्षांनी प्रचारात जान फुंकल्याचे दिसून आले. या पोटनिवडणुकीने ‘किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम’ कशी होऊ शकते, हेही दाखवून दिले. निवडणूक जाहीर झाली, तेव्हा काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर यांची जोरदार हवा होती.

Ponda By Election
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

भाटीकर भरपूर आघाडी घेऊन जिंकणार, असे बोलले जात होते. पण नंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री-आमदारांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळल्यामुळे चित्र काही प्रमाणात बदलल्यासारखे वाटत होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात काँग्रेस व भाजप एकाच पातळीवर आल्यासारखे वाटत होते. त्यामुळे ती कोणाचीही ‘गेम’ होऊ शकली असती.

प्रचारात जबरदस्त मुसंडी मारल्यामुळे भाजप बाजी मारेल, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत होते. तर ‘सायलंट व्होट’ काँग्रेसला हात देईल, असा अंदाज भाटीकर समर्थक व्यक्त करत होते. निवडणूक रद्द झाल्यानंतर रितेश आणि भाटीकर यांनी जो भावनांचा आविष्कार दाखवला, त्यातून दोघांनाही विजयाची खात्री असल्याचे दिसत होते.

मुख्यमंत्री व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रितेश नाईकांचे हमसून हमसून रडणे तर अनेकांच्या काळजाला घरे पाडून गेले. हे सगळे आता गंगेला मिळाले असले तरी त्याचे पडसाद अजूनही उमटताहेत.

म्हणूनच या पोटनिवडणुकीत कोण ‘सिकंदर’ ठरू शकला असता, याचे अंदाज वर्तविणे अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर दोन्हीही प्रमुख उमेदवारांना सहानुभूतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरात सध्या भावनाप्रधान वातावरण असून जर-तरचे अनेक तर्क व्यक्त होत आहेत. आता यातून काय नवे हाताला लागते, त्याचे उत्तर मात्र येणारा काळच देणार आहे, एवढे निश्चित.

Ponda By Election
Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

पुढे नव्या समीकरणांचा उदय

पोटनिवडणुकीची गाडी हुकल्यामुळे आता अनेकांच्या नजरा सात-आठ महिन्यांनंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकडे लागल्या आहेत. अजूनही फोंड्याचे मतदार त्या मूडमध्ये पूर्णपणे पोहचले नसले तरी या रद्द झालेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०२७ मध्ये काय होऊ शकते, याचे तर्क व्यक्त केले जात आहेत. या निवडणुकीत अनेक नवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com