Gitesh Naik: 'गीतेश नाईक यांची प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती'! आमदार फेरेरा यांचा दावा; अधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी

Gitesh Naik Ponda Elelction: फोंडा पोटनिवडणुकीत आपचे गीतेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा दावा करून आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी आक्षेप घेतला आहे.
Gitesh Naik Ponda Elelction
Gitesh Naik Ponda ElelctionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फोंडा पोटनिवडणुकीत आपचे गीतेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा दावा करून आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी आक्षेप घेतला आहे. गीतेशविरुद्ध फसवणुकीच्‍या तक्रारी दाखल आहेत,असेही त्यांनी नमूद केले आहे.

गीतेश यांनी बेंगळुरू व राजस्थानमध्ये त्यांच्याविरोधात दाखल चेक बाऊन्स व फसवणुकीच्या तक्रारींची माहिती निवडणूक आयोगाला सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात दिली नाही, असे म्‍हणत फेरेरा यांनी गीतेश यांच्‍या उमेदवारीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणावर बुधवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे.

माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांच्‍या निधनानंतर रिक्त झालेल्‍या विधानसभेच्‍या फोंडा मतदारसंघात येत्‍या ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने रितेश नाईक, काँग्रेसने केतन भाटीकर आणि आपने गीतेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली. त्‍यानंतर सोमवारी या तिन्‍ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला सादर केले.

परंतु, गीतेश नाईक यांनी अर्जासोबत सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्‍याचा मुद्दा उपस्‍थित करीत ॲड. फेरेरा यांनी त्‍यांच्‍याविरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. गीतेश नाईक यांच्‍याविरोधात बंगळुरु आणि राजस्‍थान येथे फसवणूक तसेच चेक बाऊन्‍सच्‍या तक्रारी दाखल झालेल्‍या आहेत.

बंगळुरु येथील प्रकरणात त्‍यांनी न्‍यायालयात आव्‍हानही दिलेले आहे. हे दोन्‍ही गुन्‍हे आर्थिक प्रकरणाशी संबंधित आहेत. याशिवाय गीतेश यांच्‍यावर विविध बँकांचे ३८ लाखांचे कर्ज आहे. पण, त्यांनी त्‍याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलेला नाही. त्‍यामुळेच आपण त्‍यांच्‍या उमेदवारीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे आक्षेप घेतलेला आहे. त्‍यावर बुधवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी सुनावणी घेणार आहेत, असेही फेरेरा यांनी नमूद केले.

Gitesh Naik Ponda Elelction
Ponda By Election: फोंड्यात रणधुमाळी! ‘मगो’ कार्यकर्त्यांना वळवण्‍यासाठी भाजपकडून रणनीती आखणी सुरू; प्रचारास येणार गती

गीतेशनी काढले ‘भंडारी कार्ड’

ॲड. कार्लुस फेरेरा यांनी घेतलेल्‍या आक्षेपाला गीतेश नाईक यांनीही जोरदार प्रत्‍युत्तर दिले. भंडारी समाजातील तरुणाचा आवाज दाबण्यासाठी सर्व भाटकार एकवटले आहेत. त्‍यांना भंडारी समाजाने धडा शिकवावा, असे आवाहन त्‍यांनी केले. २०१२ मध्ये भंडारी समाजाच्‍या आपल्‍यासारख्‍या नेत्याला गप्प करण्यासाठी याच भाटकारांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. आपचा स्वच्छ, विकास-केंद्रित अजेंडा व पक्षाला मिळणारे जनसमर्थन पाहून काँग्रेस व भाटकार भयभीत झाले आहेत. त्‍यामुळे भंडारी समाजाने एकजूटीन आपल्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

Gitesh Naik Ponda Elelction
Goa Politics: खरी कुजबुज; जिंकणाऱ्यांकडेच पक्षाचे लक्ष

आजच्‍या आदेशानंतर पुढील निर्णय

गीतेश नाईक यांना उमेदवारी देत असताना आपने त्‍यांची पार्श्वभूमी तपासली नाही. किंबहूना गीतेश नाईक यांनीही पक्षाला स्‍वत:बाबतची पूर्ण माहिती दिलेली नाही. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत काय आदेश घेणार, त्‍यानुसार आपण पुढील निर्णय घेणार असल्‍याचेही ॲड. फेरेरा यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com