Ponda News : फोंड्यात बसगाड्यांचे ‘राव रे, वच रे’ ; वाहतुकीचा खेळखंडोबा

Ponda News : अनधिकृत थांब्यामुळे अडथळा, पोलिसांचे दुर्लक्ष
Ponda
Ponda Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News :

फोंड्यात सध्या थांबत थांबत जाणाऱ्या बसगाड्यांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होत असून वाहतूक पोलिस मात्र काणाडोळा करताना दिसत आहेत. फोंड्यात खरे तर मुख्य बस थांबा हा कदंब बसस्‍टॅण्डवर असला तरी बसगाड्या दादा वैद्य चौकातील जुन्या बस थांब्याकडेच अधिक वेळ थांबतात.

हा थांबा शहरातील मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथे बस थांबल्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेकवेळा या बसगाड्यांमुळे मागे वाहनाच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतात.

फोंडा शहरात जाताना ‘राव रे, वच रे’ या तालावर बसगाड्या चालत असल्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वास्तविक उसगाव भागात जाणाऱ्या बसेसकरीता वरच्या बाजारातील संगम बेकरीनजीकचा अधिकृत थांबा असूनसुध्दा बसगाड्या मात्र मिळेल तिथे थांबताना दिसतात. बाजारात आधीच वाहनांनी ओंसडून वाहणाऱ्या रस्त्यावर बसगाड्या अनेक ठिकाणी थांबे घेत असल्याने वाहतुकीची कोंडी होते.

मडगाव - वास्को - सावर्डे भागात जाणाऱ्या बसगाड्यांसाठी एचडीएफसी बॅंकेजवळ अधिकृत थांबा असूनसुध्दा या बसगाड्या जुने बसस्टॅण्ड ते तिस्क या अर्धा किलोमीटरच्या परिसरात चार ते पाच थांबे घेताना दिसतात. एचडीएफसी बॅंकेच्याजवळ असलेल्या तिस्कावर परत या बसगाड्या थांबे घेत असल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही डोकेदुखी होत आहे.

यावर उपाय करण्याचे कोणच मनावर घेत नसून सध्या हा बसवाल्यांचा मनमानी कारभार मागच्या पानावरून पुढे सुरूच आहे. यामुळेच कदंब बसस्टॅण्डहून शहराबाहेर जायला वाहनांना कमीतकमी अर्धा तास तरी लागतोच. यामुळे प्रवाशांना आपल्या कामावर वेळेत पोचणे कठीण होऊन जाते. कधी कधी तर प्रवासी नसले, तर बसवाले बस मागे पुढे करून प्रवाशांना बोलावताना दिसतात.

सध्या फोंड्यातून कुर्मगतीने चालणाऱ्या बसवाल्यांमुळे अनेक समस्या उभ्या होताना दिसत आहेत. प्रवाशांची तर कुंचबणा होतेच, पण वाहनचालक व पादचाऱ्यांनाही हा त्रास सहन करावा लागतो. याकरिता अशा बसवाल्यांवर कारवाई होणे आवश्‍यक आहे. पण वाहतूक पोलिसही याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. यामुळे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी फोंड्याकडे लक्ष देऊन नियम तोडून वाहतूक करणाऱ्या बसवाल्यांवर कारवाई करावी.

- घनश्‍याम नाईक, उपाध्यक्ष, फोंडा विकास समिती

Ponda
Goa Power Tariff Hike: गोमंतकीयांच्या खिशाला झळ बसणार, रविवारपासून वीज दरवाढीचा शॉक

बस वाहतूक बगलमार्गाने व्हावी

फोंडा शहर आता फारच विस्तारल्यामुळे इतर शहरांप्रमाणे फोंड्यातील बसवाहतूक बगलमार्गावरून व्हायला हवी, पण फोंडा हे एकमेव शहर अशा प्रकारच्या वाहतुकीला अपवाद म्हणावे लागेल. त्यामुळे सध्या वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून वाहतूक खात्याने यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी त्रस्त प्रवासी करत आहेत. ‘राव रे वच रे’ या बसवाल्यांच्या प्रवृत्तीमुळे अनेक छोटेमोठे अपघात घडताना दिसत आहेत. यामुळे बगलमार्गावरून वाहतूक केल्यास शहरावरचा ताण कमी व्हायला मदत होऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com