Goa Power Tariff Hike: गोमंतकीयांच्या खिशाला झळ बसणार, रविवारपासून वीज दरवाढीचा शॉक

Goa Power Tariff Hike: 200 कोटी थकबाकीचा सर्वसामान्य गोमंतकीयांना बसणार फटका?
Power Tariff Hike in Goa
Power Tariff Hike in GoaDainik Gomantak

Goa Power Tariff Hike

लवकरच गोमंतकीयांच्या खर्चात वाढ होणार असून, रविवारपासून वीज दरवाढ लागू केली जाणार आहे. राज्याच्या संयुक्त वीज नियामक आयोगाने (JERC) उद्यापासून (रविवार, दि.16 जून) नव्या वीज दरवाढीला परवानगी दिलीय.

त्यानुसार 3.5 टक्के दरवाढ लागू केली जाणार आहे. राज्यातील 54 टक्के ग्राहकांना या दरवाढीची झळ बसणार आहे.

कमी दाब वीज वापरकर्त्यांना या दरवाढीचा शॉक बसेल, माहितीनुसार राज्यात 54 टक्के असे ग्राहक आहेत. रविवारपासून नवी दरवाढ लागू होणार असून, आयोगााने नुकतीच याला मान्यता दिली आहे.

राज्यात 0-100 युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक युनिटसाठी यापुढे 1.90 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी हा दर 1.75 रुपये एवढा होता. तर, 101-200 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक युनिटसाठी 2.8 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी हा दर 2.6 रुपये एवढा होता.

Power Tariff Hike in Goa
Khandola Road : रायबंदर रस्ता वाहतुकीस धोकादायक; वाहनचालकांना त्रास

दरम्यान, या दरवाढी विरोधात गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने संयुक्त वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुका समाप्तीनंतर गोवा सरकारने नागरिकांना 3.5 टक्के दरवाढीचे रिटर्न गिफ्ट दिले आहे. सरकारला सामान्य नागरिकांचे पडलेले नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत म्हणाले.

सरकारने सामान्य नागरिकांवर दरवाढीचे ओझे टाकण्यापेक्षा 200 कोटींपेक्षा अधिक असणारी थकबाकी वसूल करावी, असेही कामत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com