फोंडा: फोंडा बसस्थानक अद्ययावत करण्याचा मानस असून त्यासाठी डिझाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रवासी तसेच बसवाल्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा खटाटोप असून प्रवाशांचे हित लक्षात घेऊनच या बसस्थानकाचे डिझाईन केले जाईल, असे मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
मडकई मतदारसंघातील बांदोडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या कदंब बसस्थानकावरील अद्ययावत सुविधांनी युक्त बांधलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन आज (शुक्रवारी) सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच रामचंद्र नाईक, स्थानिक पंचसदस्य सोनिया नाईक, पंचसदस्य वामन नाईक, विशांत नाईक, सुलभ इंटरनॅशनलचे सुशीलकुमार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
सुदिन ढवळीकर म्हणाले की, एखाद्या बसस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना आवश्यक सुविधा या मिळायला हव्यात. त्यामुळे पुढील काळात हा बसस्थानक माझ्या स्वप्नातील असेल. गेल्या वर्षी या स्वच्छतागृहाची पायाभरणी करण्यात आली होती. एका वर्षात काम पूर्ण करून नियोजित वेळेत हे स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात आल्याने आता नागरिकांची चांगली सोय होईल.
राज्यात फोंडा बसस्थानक हे मध्यवर्ती भागात आहे. फोंडा, मडकई, प्रियोळ आणि शिरोडा मतदारसंघांसाठी हे बसस्थानक केंद्र बनले आहे. राज्यातून कुठेही जायचे असेल तर फोंडा हे मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने या बसस्थानकावर राज्य तसेच आंतरराज्य स्तरावरील प्रवासी बसगाड्या येतात. याशिवाय खासगी टूर ऑपरेटरही याच बसस्थानकावरून आपल्या गाड्या सोडत असतात.
अत्याधुनिक सुविधांनी युक्त बांधलेल्या या स्वच्छतागृहाला ६७ लाख रुपये खर्च आला आहे. एका वर्षात हे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. हे स्वच्छतागृह सुलभ इंटरनॅशनलच्या ताब्यात असून चांगली सेवा उपलब्ध केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.