Ponda News : विरियातो फर्नांडिस यांच्यावर कारवाई व्हावी! मुख्यमंत्री

Ponda News : काल कुर्टी - फोंड्यात भाजपच्या प्रचार सभा व बैठकांना उपस्थिती लावून मुख्यमंत्र्यांनी मतदारांशी संवाद साधला.
Ponda
PondaDainik Gomantak

Ponda News :

फोंडा, देशाचे संविधान गोव्यावर लादले, असे विधान करून देशाचा घोर अवमान करणारे दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी जोरदार मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

काल कुर्टी - फोंड्यात भाजपच्या प्रचार सभा व बैठकांना उपस्थिती लावून मुख्यमंत्र्यांनी मतदारांशी संवाद साधला. कुर्टीतील सावित्री सभागृहात गोव्यातील उत्तर व दक्षिण भारतीय नागरिकांशी संवाद साधण्यासाठी बोलावलेल्या सभेला कृषीमंत्री रवी नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, भाजपाचे फोंडा मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक विश्‍वनाथ दळवी तसेच कर्नाटकातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान न मानणारे काँग्रेसचे लोक देशाचे कोणते हित करणार आहेत, असा सवाल करून काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी यांनी विरियातो फर्नांडिस यांना समर्थन दिल्याने या सर्वांवर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

Ponda
Delhi Liquor Scam: केजरीवाल यांची अटक कायदेशीर; गोवा निवडणुकीतील मनी ट्रेलबाबत ED कडे भरपूर पुरावे

‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय समोर ठेवून आणि विकसित भारताचे स्वप्न साकरण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यरत आहेत, त्यांचे हात मतदारांनी बळकट करायला हवेत. देशाच्या हिताचे निर्णय हे भाजपाने घेतले असून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची संकल्पना दृढ करण्यासाठी सर्वांनी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

कुर्टी येथील मुस्लीम बांधवांशीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत व कृषीमंत्री रवी नाईक यांनी संवाद साधला. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली व भाजपालाच मतदान करावे, असे आवाहन केले.

भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही. देशाच्या विकासासाठी आणि हितासाठी भाजपाला पूर्ण बहुमतांनी निवडून आणण्यासाठी मतदारांनी काम करावे. फोंड्यातील मतदारांनी भाजपाला बहुसंख्येने मतदान करावे.

-रवी नाईक, कृषिमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com