Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News : संपूर्ण खाण-महसूल कायम खनिज निधीत जमा करण्यासाठी कोर्टात

Panaji News : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘स्वयंपोषक विकास’ विषयावरील परिषदेत क्लॉड आल्वारिस यांचे मत
Published on

Panaji News : पणजी, गोव्याच्या खाण उद्योगातून तयार होणारा संपूर्ण महसूल कायम ‘खनिज निधी’मध्ये गोळा होऊन नॉर्वे देशाप्रमाणे त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे, असे मत गोवा फाऊंडेशनचे क्लॉड आल्वारिस यांनी आज ‘सीआयईएसएसजी’च्या ‘स्वयंपोषक खनिज व्यवसाय’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त केले.

प्रदूषण नियंत्रण मंडळ, सीआयआय यांनी येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली.

त्यातील ‘स्वयंपोषक खनिज व्यवसाय’ या विषयावर पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य अविजीत घोष, टाटा स्टिलच्या फेरो मिनरल विभागाचे पंकज सतिजा, तसेच क्लॉड आल्वारिस यांच्यासह ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी भाग घेतला.

आल्वारिस म्हणाले की, पुढच्या नऊ वर्षांत गोव्यातील लोहखनिज नष्ट होणार आहे. त्यामुळे हा उद्योग मुळीच स्वयंपोषक नाही. ब्रिटनमधील खनिजे संपूर्ण संपली व त्या देशावर संकट कोसळले आहे. गोव्यात १० दशलक्ष टन लोहखनिजाचे साठे होते.

त्यातील निम्मे संपले आहेत. खाण व्यवसायाने यापूर्वीच राज्याला संकटाच्या खाईत लोटले आहे व खाण खात्यात साधा मायनिंग इंजिनियर नाही. अशा परिस्थितीत या उद्योगातून तयार होणारा महसूल खर्च न करता संपूर्णत: ‘खनिज निधी’मध्ये जमा व्हावा म्हणून आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Panaji
Goa Budget Session 2024: अर्थसंकल्पात गोव्याच्या पर्यटन, पुरातत्व खात्यासाठी अशा आहेत तरतूदी? वाचा एका क्लिकवर

राजू नायक यांनी, ५० वर्षांसाठी खाणी लिलावावर भरमसाट बोलीवर देण्यात आल्याने गोव्यातील गावे नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याचे सांगून लोकांना आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे मत मांडले. नागरी समाजाला विश्‍वासात घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याशिवाय लोक खाणी सुरू करायला मज्जाव करू शकतात, असे ते म्हणाले.

टाटा स्टिलचे पंकज सतिजा यांनी, ११२ टक्क्यांच्या बोलीवर लिजेस प्राप्त केल्या जात असल्याने त्या फायद्यात चालण्याची शक्यता नाही, असे सांगितले. डॉ. आर. के. बन्सल यांनी सूत्रसंचालन करताना विविध नियमांची अंमलबजावणी करण्याची तयारी करावी लागणार आहे व गेल्या काही वर्षांत बेकायदेशीर खाणी व नियमबाह्य वाहतूक बंद झाल्याचे मत मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com