Goa Budget Session 2024: अर्थसंकल्पात गोव्याच्या पर्यटन, पुरातत्व खात्यासाठी अशा आहेत तरतूदी? वाचा एका क्लिकवर

आज (8 फेब्रुवारी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. 2024-25 साठी एकूण 26.855 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Goa Budget Session 2024 | Goa Budget for Archeology Department | Goa Budget for Tourism Department
Goa Budget Session 2024 | Goa Budget for Archeology Department | Goa Budget for Tourism Department Dainik Gomantak

Goa Budget Details 2024

आज (8 फेब्रुवारी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. 2024-25 साठी एकूण 26.855 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सर्व क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या निधीवाटपाबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली.

तब्बल 2 तासांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांनी वर्षभराचा आर्थिक लेखाजोखा विधानसभेत सादर केला. गोव्याची ओळख असलेल्या पर्यटन आणि पुरातत्व खात्यासाठी सरकारतर्फे करण्यात आलेल्या तरतुदी इथे जाणून घ्या.

पर्यटन विभागासाठीच्या तरतुदी (Goa Budget for Tourism Department)

यंदा पर्यटन क्षेत्रासाठी एकूण 255 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 • पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सेवा कराराची घोषणा

 • किनारी बेड डेक व छत्र्यांसाठी नवीन धोरणाची अधिसूचना

 • अतिदक्षता क्षेत्र संवर्धनासाठी 50 लाखांची तरतूद

 • जीटीडीसी साठी 83 कोटींची तरतूद

 • राजभवन दर्शन, मये दर्शन योजना

 • पर्यटनाचे नवे आयाम आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार

 • मंदिरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखीसाठी प्रयत्न

 • दूधसागर ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध केली जाणार

गेल्यावर्षी पर्यटन खात्यासाठी 262.85 कोटींची तरतूद करण्यात आली होती. गेल्यावर्षी तळदे - धारबांदोडा येथे 100 घरांमध्ये ‘होम स्टे’ सुविधा तयार करण्यावर आणि पर्यटनवृद्धीसाठी राज्याचे ''होम स्टे'' धोरण तयार करण्यावर भर देण्यात आला होता.

त्या तुलनेत यंदा 255 कोटीच पर्यटन खात्याला देण्यात आले आहेत. असे असले तरी पर्यटनाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुरातत्व खात्यासाठीच्या तरतुदी (Goa Budget for Archeology Department)

यावर्षी पुरातत्व खात्यासाठी 40 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 • पुरातत्व खाते समृद्ध करण्यासाठी विविध ठिकाणच्या गोव्याशी संबंधित दस्तऐवज डिजिटल स्वरूपात मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

 • हेरिटेज पॉलिसी फॉर स्टेट ऑफ गोवा सुरु करणार

 • विविध ठिकाणच्या जुन्या महत्त्वाच्या वास्तू ऐतिहासिक म्हणून घोषित करणार

 • पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनरुद्धारासाठी स्मृती मंदिर योजनेतून 20 कोटींची तरतूद

राज्याच्या इतिहासाशी संबंधित पुरातत्व वास्तू आणि दस्तऐवजांच्या रूपांतरणावर सरकार यंदा भर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com