Goa Water Pollution : नाल्यात प्रदूषित पाणी ‘त्याच’ कंपनीचे

सरपंच देवानंद परब : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाकडून पिसुर्लेत पहाणी
Goa Water Pollution
Goa Water PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

सत्तरीतील पिसुर्ले येथील औद्योगिक वसाहतीतील एका प्रकल्पातील प्रदूषित पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आमदार डॉ. दिव्या राणे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Goa Water Pollution
Goa Tiger project : व्याघ्र प्रकल्पाचा कडवळ, वायंगिणीला फटका

सोमवारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तातडीने येथे भेट देत पाहणी केली तसेच पाण्याचे नमुने गोळा केले. दरम्यान, सरपंच देवानंद परब यांनी दूषित पाणी त्याच प्रकल्पातील असून कंपनीचे व्यवस्थापक खोटे बोलतात असा आरोप केला.

पिसुर्ले येथील औद्योगिक वसाहतीत फोंडा इनवोकॅर लि. या कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु आहे, त्यासाठी येथील शेकडो चौरस मीटर जमीन वापरण्यात आली आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहतींमधील कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पातील रसायनयुक्त पाणी कंपनीने संरक्षक भिंतीच्या बाहेर उघड्यावर सोडलेले आहे. हे पाणी वाहून जवळ असलेल्या नैसर्गिक नाल्यात जाते. त्यामुळे नाल्यातील जलसंपदा तसेच येथील पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

Goa Water Pollution
वाहन परवान्यासाठी प्रणाली कडक हवी; DGP Jaspal Singh

दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कंपनीने सारवासारव सुरू केली असून ते पाणी कंपनीचे नसल्याची भूमिका कंपनी व्यवस्थापनाने घेतली आहे. कंपनीच्या या भूमिकेमुळे नागरिकांत संताप पसरला आहे. अशी भूमिका घेऊन प्रदूषित पाणी नाल्यात सोडणे सुरूच ठेवल्यास या कंपनी विरोधात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

आमदाराकडून गंभीर दखल

सरपंच देवानंद परब यांनी याबाबत आमदार डॉ. दिव्या राणे यांना कळविल्यानंतर त्यांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून सविस्तर अहवाल गोळा करण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी सकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक पिसुर्लेत दाखल झाले. पथकाने या परिसराची पाहणी करून नमुने गोळा केले. या पथकात देवेश घोलकर, शेर्विन डिकॉस्ता, लुईजा डी सिल्वा, रिया गावडे आदींचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com