Valpoi News : चरावणेचा युवक शेतीतून ‘स्वयंपूर्ण’ते कडे; भाजीपाला पिकवण्यावर भर

पडिक असलेल्या परंपरागत शेतीत दरशथ गावस यांनी पिकवली ज्वारी
Dashrath Gawas
Dashrath GawasDainik Gomantak
Published on
Updated on

सपना सामंत

सत्तरी हा कृषी प्रधान तालुका आहे, गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात विविध प्रकारची शेती केली जायची. मात्र कालांतराने, शेतीकडे पाठ फिरवून काहीजण नोकरीमागे धावत गेले. परिणामी पारंपारीक शेती पडीक होत गेली.

खंडित झालेली शेती पुर्नजिवीत करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. कृषी खात्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत चरावणे सत्तरी येथील दशरथ कृष्णा गावस यांनी शेतीतून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ते शेती व्यवसायात उतरले असून गेल्या वर्षी पहिल्यांदाच सुमारे सातशे किलो आल्याचे, तर हळदीचे सुमारे दीडशे किलो पीक घेतले होते.

Dashrath Gawas
Goa Beach Shacks: पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यामुळे बहुतेक शॅक्स 31 मेच्या अंतिम मुदतीपूर्वी बंद

एकूण दोन एकरात त्यांनी भोपळा, चिटकी, वालपापडी, तांबडी भाजी, मुळा, मिरची, लाल रताळी, अळसांदे, वाल, माका, मका, भेंडी, वांगी, नवलकोल (गड्डे) , टोमॅटो तर इतर भाज्यांची लागवड केलेली होती. त्यातून आर्थिक लाभही झाला होता. ऋतूमानानुसार ते भाज्यांची लागवड करतात.

यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच जोंधळे (ज्वारी)ची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे. नोव्हेंबर मध्ये त्यांनी मशागत करुन बियाणे पेरले होते. त्यानंतर आता त्यांचे पीक तयार झाले आहे. कणसांवरून त्यांच्या कष्टाचे फळ दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी दशरथ गावस खुश आहेत. अर्ध्या एकरात त्यांनी ही ज्वारीची लागवड केलेली आहे. त्यांनी जोंधळ्याचे बेळगाव येथून बियाणे आणले होते.

दशरथ गावस म्हणाले, नोव्हेंबर मध्ये ज्वारी बरोबर आंतरपीक म्हणून भाज्यांची लागवड केली होती. पूर्वी दशरथ हे बस बांधणी प्रकल्पात कामाला होते. काही कारणांनी नोकरीतून सेवा निवृत्ती लवकर घ्यावी लागली. त्यामुळे रोजगाराचा प्रश्‍न होता. त्यातच कोरोनाचा काळ असल्याने आर्थिकदृष्ट्या परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे निश्चय केला की, शेती करुन स्वंयरोजगार करावा. पहिल्यांदा आले व हळदीची लागवड केली. व त्यात चांगले उत्पादन मिळून लाभ झाला.

दशरथ गावस यांनी सांगितले,की एप्रिलमध्ये भेंडी व वालपापडीची लागवड केली आहे. भेंडीची रोपे सध्या वर येत आहेत. त्यामुळे जुलैपर्यंत काढणीला तयार होईल. नाचणीची शेतीही करणार आहे.

Dashrath Gawas
Margao : मडगावात फेस्ताच्या फेरीतील स्टॉलधारकांना अखेर दिलासा

कृषी अधिकरी, कुटुंबाची साथ मोलाची !

वाळपई विभागीय कृषी कार्यालयाच्या आत्मा योजनेचा मोठा फायदा झाला आहे. व जमिनीची मशागत कशी करावी, लागवड पासुन ते पिक घेई पर्यंत वाळपई कृषी अधिकारी विश्वनाथ गावस व इतर कर्मचारी वर्गांचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आपण आज ही शेती करू शकलो. ही पूर्ण शेती सेंद्रिय पध्दतीने लागवड केलेली आहे. त्यामुळे ह्या उत्पादनाला बाजारात चांगले दर मिळतात. दशरथ यांच्या कामात कुटुंबीयांचेही सहकार्य मिळत आहे.

राज्य सरकारने हे वर्ष बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ज्वारी, नाचणी व इतर धान्याची शेतात लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

विश्वनाथ गावस, कृषी अधिकारी वाळपई

कोरोना काळात सर्वत्र बिकट स्थिती होती. तेव्हा आपल्यावरही निवृत्ती स्वीकारण्याची वेळ ओढवली.पण खचून न जाता आपण परिस्थितीवर मात करू शकतो,हा विश्‍वास पिढी परंपरागत शेतीने दिला. म्हणूनच आपण शेतीकडे वळलो.

दशरथ गावस, युवा शेतकरी, चरावणे -सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com