Goa Loksabha Congress
Goa Loksabha CongressDainik Gomanatk

Goa Politics: उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून नवा चेहरा देण्याचा कॉंग्रेसचा विचार?

Goa Politics: कवठणकरांच्या नावाची घोषणा अडली : दक्षिणेतून विरोधी पक्षनेते इच्छुक
Published on

Goa Politics:

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून नवा चेहरा देण्याचा विचार कॉंग्रेसने चालवला होता. प्रदेश पातळीवरून माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप आणि प्रदेश सरचिटणीस विजय भिके यांची नावे दिल्लीत पाठवण्यात आली होती. नवा चेहरा म्हणून भिके यांच्या नावाचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा प्रदेश पातळीवर अनेकांना होती.

दिल्लीतील बैठकीत उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार निश्चित करताना वरिष्ठांनी ठरवलेल्या नावांना प्रदेश पातळीवरील नेत्यांची संमती मिळणे कठीण झाले आहे.

यामुळे गोव्यातील केवळ दोन जागांचा गुंता सोडविणे देशभराचे राजकारण करणाऱ्या कॉंग्रेसच्या धुरिणांना कठीण झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवार ठरवण्यावरून कॉंग्रेसमधील गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे.

नवा चेहरा म्हणून भिके यांच्या नावाचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा प्रदेश पातळीवर अनेकांना होती. खुद्द भिके यांनाही आपणास उमेदवारी मिळेल, अशी अजूनही खात्री आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्या नावाचा विचार कॉंग्रेसने वरिष्ठ पातळीवर चालवला आहे.

Goa Loksabha Congress
Water Problem: पाण्यासाठी महिला एकवटल्या; टँकरमधून पुरवठ्याची मागणी

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत कवठणकर यांच्या नावाची घोषणा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून करावी असे जवळजवळ ठरले होते. आज दुपारी तशी घोषणाही होणार होती; पण कॉंग्रेसमध्ये सारेकाही सुरळीत होत नसते त्यामुळे कवठणकर यांच्या नावाला तत्काळ आक्षेप घेण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कवठणकर यांना उमेदवारी दिली तर वेगळा विचार करावा लागेल, असे पक्षश्रेष्ठींना कळवल्याने कवठणकर यांच्या नावाचा विचार तूर्त मागे पडला आहे, अशी माहिती दिल्लीतून मिळाली आहे.

Goa Loksabha Congress
Goa Congress Internal Politics: गोवा काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण, इच्छुकांची मांदीयाळी

पाटकर आणि आलेमाव आपल्या म्हणण्यावर गुरुवारी (ता.२८) सायंकाळी उशिरापर्यंत ठाम राहिले तर ॲड. खलप यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाऊ शकते. तसे झाले तर कवठणकर व भिके समर्थक युवा ब्रिगेड त्यांना कितपत सहकार्य करेल याविषयी शंका आहे.

कॉंग्रेसने कोणालाही उमेदवारी दिली तर त्या उमेदवाराच्या विरोधात दोन गट असतील, अशी पक्षाची सध्या अवस्था आहे. सर्व गटातटांना एकत्र ठेवणाऱ्या नेतृत्वाची सध्या वानवा आहे. त्यामुळे तेलंगणध्ये ‘कॉंग्रेसजन तितुका मेळवावा’चा प्रयोग करणारे माणिकराव ठाकरेदेखील या गटातटाच्या राजकारणापुढे निष्प्रभ ठरत असल्याचे दिसते.

गटबाजीचाच कॉंग्रेसला धोका!

  • दक्षिण गोव्यातून आपल्याला उमेदवारी मिळू नये यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश चोडणकर यांनी केला आहे. यावरून कॉंग्रेसमधील निर्णय कसे घेतले जातात यावरच त्यांनी नकळतपणे प्रकाश टाकला आहे.

  • दक्षिण गोव्यातून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचीही संसदेत जाण्याची महत्त्वाकांक्षा उफाळून आली आहे. काही दिवसांपूर्वी पाटकर हेही इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होते.

  • कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यास ते चांगली टक्कर देतील, असे कॉंग्रेसमधीलच काही जणांचे म्हणणे आहे.

  • हे सारे सुरू असताना खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी काय खेळी खेळली आहे, याची कल्पना कोणालाच नाही. उत्तर गोव्याप्रमाणे दक्षिण गोव्यातही कॉंग्रेसला त्यांची गटबाजीच मार देणार असे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com