Goa Politics: 'विरोधकांनी आरशात बघा, नरकासुर दिसेल', कामतांचा टोला; पर्वरी उड्डाणपुलाबाबत संयम बाळगण्याचे आवाहन

Digambar Kamat: फातोर्ड्यातील कार्यक्रमात नरकासुर एकत्र आले की देव? असा प्रश्‍‍न त्‍यांनी पत्रकारांनाच केला. विरोधक एकत्र आल्‍यावरून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी योग्‍य ते उत्तर दिले आहे.
Digambar Kamat News
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शंभर विरोधक एकत्र आले तरी मला काहीही फरक पडत नाही. विरोधकांनी आरशासमोर उभे राहून स्‍वत:चे चेहरे बघावेत. नरकासुर कोण ते त्‍यांना कळेल, असा टोला सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी लगावला.

येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना कामत म्‍हणाले की, नरकासुर दहनाच्‍या आदल्‍या रात्री फातोर्डा येथे आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, ‘आरजी’चे अध्‍यक्ष मनोज परब यांनी एका व्‍यासपीठावर येऊन एकीचे दर्शन घडविले.

त्‍यावेळी त्‍यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करताना काही जणांना नाव न घेता नरकासुराची उपमा दिली होती. त्‍यावर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘विरोधकांनी स्‍वत:ला देव समजू नये’ असे म्‍हटले होते.

दरम्‍यान, याबाबत पत्रकारांनी दिगंबर कामत यांना छेडले असता, फातोर्ड्यातील कार्यक्रमात नरकासुर एकत्र आले की देव? असा प्रश्‍‍न त्‍यांनी पत्रकारांनाच केला. विरोधक एकत्र आल्‍यावरून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी योग्‍य ते उत्तर दिले आहे.

दामबाबाच्‍या आशीर्वादाने गेल्‍या ३० ते ३५ वर्षांपासून आपण मडगावात निवडून येत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात शंभर विरोधक एकत्र आले तरी त्‍याचा माझ्‍यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्‍हणाले. विरोधकांनी एकदा आरशासमोर उभे राहून स्‍वत:चे चेहरे पाहावेत, नरकासुर कोण आहेत ते त्‍यांना कळेल, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

Digambar Kamat News
Goa Politics: "तेच खरे नरकासुर!" विरोधकांच्या एकजुटीवर वीजमंत्री ढवळीकरांचा हल्लाबोल, नरकासुर दहन प्रथा बंद करण्याचीही केली मागणी

चांगल्‍या प्रकल्‍पांवेळी त्रास होतोच, थोडा संयम बाळगा

चांगले प्रकल्‍प सुरू असताना काही काळ त्रास सहन करावाच लागतो. अशा वेळी जनतेने संयम बाळगणे गरजेचे असते. पर्वरीतील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याचा फायदा जनतेलाच होणार आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

झुवारीपुलाचे काम सुरू असतानाही प्रवासी, वाहनचालकांना अनेक समस्‍यांना सामोरे जावे लागले होते. परंतु पुलाचे काम पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याचा फायदा त्‍यांनाच झाला. त्‍याच पद्धतीने पर्वरीतील उड्डाणपुल‍ाचे काम पूर्ण झाल्‍यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळेल. मात्र त्‍यासाठी काही काळ संयम बाळगणे आवश्‍‍यक आहे, असे कामत म्‍हणाले.

Digambar Kamat News
Goa Politics: 'विरोधकांनी भ्रमात राहू नये', 'नरकासुर' संबोधल्यानंतर CM प्रमोद सावंतांचा जोरदार पलटवार

आधी खड्डे बुजवा, मग हॉटमिक्‍स करा

राज्‍यातील सर्वच भागांतील रस्‍त्‍यांच्‍या हॉटमिक्‍स डांबरीकरणाची कामे हळूहळू सुरू होत आहेत. पावसामुळे अजून काही प्‍लांट सुरू करण्‍यात आलेले नाहीत. हॉटमिक्‍स डांबरीकरणाची कामे हाती घेताना प्रथम त्‍या रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजवण्‍याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना देण्‍यात आलेले आहेत. त्‍यानुसार या कामांना गती देऊन लवकरच रस्‍त्‍यांचे हॉटमिक्‍स डांबरीकरण पूर्ण केले जाईल, अशी ग्‍वाही मंत्री कामत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com